sakal

बोलून बातमी शोधा

A case has been registered against former BJP district president Shirish Katekar at the city police station for making offensive remarks about Chief Minister Uddhav Thackeray

दरम्यान शनिवारच्या घटनेनंतर शिरीष कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अखेर 'त्या' भाजप नेत्या विरोधात गुन्हा दाखल ! मुख्यमंत्र्यांविरुद्धचे व्यक्तव्य भाेवले

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शहर शिवसेना प्रमुख रवी मुळे यांनी फिर्याद दिली आहे.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

शुक्रवारी (ता.5) भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली वीज बील माफीच्या मागणीसाठी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष यांनी भाषण केले होते. त्यांनी भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शनिवारी (ता.6) समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद शहर व तालुक्यात उमटले. त्यातूनच शनिवारी सायंकाळी शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी चांगलाच चोप ही दिला होता. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा :  वाळूज, देगाव परिसरातील ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची निवड होणार मंगळवारी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शहर शिवसेनेचे अध्यक्ष रवी मुळे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जयवंत माने, सुधीर अभंगराव, संदीप केंदळे, सिध्देश्वर कोरे यांनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेवून वादग्रस्त वक्तव्य करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. या प्रकरणी शिरीष कटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन दिले. त्यानुसार रात्री संशयित आरोपी  शिरीष कटेकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण पवार हे करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान शनिवारच्या (कालच्या) घटनेनंतर शिरीष कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. भाजप नेते शिरीष कटेकर यांनी अनवधानाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करणे अपेक्षित असताना शिवसैनिकांनी कायदा हातात घेवून त्यांना मारहाण करणे योग्य नाही. त्यांच्या कृतीचा भाजप म्हणून निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शहर भाजपचे अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिली आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक या विषयी अधिक बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.

go to top