हॉटेल कामगार आत्महत्या प्रकरण : तपासात अडथळा आणल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल 

चंद्रकांत देवकते 
Monday, 31 August 2020

हॉटेल रुची येथे रविवारी सकाळी तेथील कामगार कुलदीपसिंग सोनसिंग मरावी (रा. मध्य प्रदेश) याने लॉकडाउनच्या काळात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यासंदर्भात हॉटेल चालक गाजरे (पंढरपूर) यांना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी संपर्क करत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान छाया जगदाळे, संदीप देशमुख व अन्य एकजण असे तिघेजण पोलिस ठाण्यात आले व पोलिस उपनिरीक्षक बाडीवाले यांना, तुम्ही गाजरे यांना का बोलावले? त्यांचा काय संबंध आहे? असे म्हणत छाया जगदाळे यांनी पोलिस उपनिरीक्षकांच्या शासकीय वर्दीची गच्ची पकडली व त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी त्यांना हाताने मारण्याचा प्रयत्न केला. 

मोहोळ (सोलापूर) : येथील कन्या प्रशाला चौकातील रुची हॉटेलमध्ये हॉटेल कामगाराने केलेल्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी हॉटेल चालविणाऱ्यांना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी बोलावले असता त्यांनी एका महिलेला पाठवून दिले. त्या महिलेने संबंधित अधिकाऱ्याला "तुम्ही गाजरे यांना कशासाठी बोलावले आहे?' असे म्हणत पोलिस अधिकाऱ्याची गच्ची पकडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित महिलेसह तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. 30) सायंकाळी घडली. 

हेही वाचा : लॉकडाउनच्या कालावधीत हॉटेल कामगाराने घेतला गळफास 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल रुची येथे रविवारी सकाळी तेथील कामगार कुलदीपसिंग सोनसिंग मरावी (रा. मध्य प्रदेश) याने लॉकडाउनच्या काळात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यासंदर्भात हॉटेल चालक गाजरे (पंढरपूर) यांना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी संपर्क करत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. त्यादरम्यान पाच वाजता बाडीवाले यांना फोन आला, की तुम्हाला या प्रकरणाबाबत आम्हाला माहिती द्यायची आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक बाडीवाले यांनी त्यांना पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. त्या वेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान छाया ज्ञानेश्वर जगदाळे (रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर), संदीप शहाजी देशमुख (रा. सिद्धार्थ नगर, मोहोळ) व अन्य एकजण असे तिघेजण पोलिस ठाण्यात आले व पोलिस उपनिरीक्षक बाडीवाले यांना, तुम्ही गाजरे यांना का बोलावले? त्यांचा काय संबंध आहे? असे म्हणत छाया जगदाळे यांनी पोलिस उपनिरीक्षकांच्या शासकीय वर्दीची गच्ची पकडली व त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी त्यांना हाताने मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी यार महिलेने तुम्हाला सोडणार नाही, तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते, अशी धमकी दिली. 

हेही वाचा : कोरोना काळात आंदोलन करणे अयोग्य? "वंचित'च्या आंदोलनाला वारकरी संघटनेचा विरोध 

या वेळी पोलिस उपनिरीक्षक मुजावर, पोलिस नाईक बोरकर, पोलिस नाईक माने, पोलिस कॉन्स्टेबल घाडगे, बंडगर कर्मचारी यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सोडवासोडवी करत दोघांना ताब्यात घेतल्याची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी दिली असून, वरील तिघा जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ढाकणे करीत आहेत. 

रुची हॉटेलमधील कर्मचारी आत्महत्याप्रकरणी मागील दोन-तीन महिन्यांत हॉटेल चालक गाजरे यांनी चौकशी का केली नाही? ते या ठिकाणी येऊन गेले होते, की काय? या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against three persons for obstructing the investigation into a hotel worker suicide case