महिला खातेदाराच्या जनधन खात्याचा गैरवापर; शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

A case has been registered for misusing Jandhan account in Mangalwedha
A case has been registered for misusing Jandhan account in Mangalwedha

मंगळवेढा (सोलापूर) : घराशेजारी राहत असलेल्या महिला खातेदाराच्या जनधन खात्यात स्वतःचा मोबाईल जोडून फोन पे वरून 1 लाख 17 हजारांचा गैरवापर केला. गैरवापर करून विचारणा केल्यास शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विजय अण्णासो लोंढे (रा. गडदे वस्ती) उचेठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

यासंदर्भात दाखल फिर्यादीनुसार स्वाती कुमार कांबळे (वय 35) या महिलेने तिचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत एप्रिल 2017 मध्ये जनधन खाते उघडण्यात आले होते. सदर खात्यावर ॲट्रॉसिटीच्या संदर्भाने समाज कल्याण विभाग सोलापूर यांच्याकडून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला होता.  सदरच्या खात्यावरील आर्थिक व्यवहार त्यांच्या घराशेजारी राहत असलेला विजय लोंढे हा करीत होता.

सदर महिलेला विश्वासात घेऊन त्याने एटीएम देखील काढून स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे खात्यावर काढलेल्या व शिल्लक रकमेची माहिती देखील तोच देत होता. सदर महिलेने भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून 83 हजार रुपये काढण्यात आले होते. परंतु कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे सदरची महिला पैसे काढण्यासाठी बँकेकडे गेली नाही. परंतु ज्या वेळी तिने पैशाची गरज असताना गेले असता तिला तिच्या खात्यावरील शिल्लक रक्कम कमी असल्याचे आढळून आले. 

त्याबाबत त्यांनी बँकेत चौकशी केली असता सदरची रक्कम फोन पे वरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर खातेदार महिलेच्या खात्याला 9561487070 हा स्वतः वापरत असलेला मोबाईल क्रमांक जोडून या क्रमांकावरून 22 फेब्रुवारी ते 19 ऑगस्ट 2020 या कालावधीत फोन पे वरून एक लाख 17 हजार रुपयाचा आर्थिक विनापरवाना अपहार केला आहे. याबाबत विचारणा केली असता मला पैसे बाबत काही विचारायचे नाही. तुला बघून घेईन, सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com