कलापिनी जागतिक संगीत महोत्सवाची शतकोत्तरी 

sangeet mahostav.jpg
sangeet mahostav.jpg

पंढरपूर(सोलापूर)ः संगीत शिक्षणासाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत असलेल्या कलापिनी संगीत विद्यालय, पंढरपूरच्या वतीने 6 जून पासून सूरू केलेल्या कलापिनी फेसबूक लाईव्ह जागतिक संगीत महोत्सव 2020" यास आज 100 दिवस पूर्ण झाले. यामध्ये आजपर्यंत एकुण 120 कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य श्री दादासाहेब पाटील यांनी दिली. 

आदर्श संगीत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकार झाला. 

या महोत्सवात श्रीकांत फाटक(बडोदा), सुधीर काळे(पुणे), जिनय छेडा, (मुंबई),जय कराड(जालना), पॉली वर्गीय(चेन्नई),अतुल कांबळे(पुणे),अविनाश पाटील( पुणे), दादासाहेब पाटील(पंढरपूर), अमेय देशपांडे(सातारा),महेश केंगार(पुणे), सचिन पावगी, (पुणे), रोहित गडकर(पुणे), दिपक दाभाडे(कोल्हापूर),अथर्व कागलकर(पुणे),मयुर जोशी(सांगली), डॉ. अविराज तायडे(नाशिक), डॉ. हेरंबराज पाठक(अक्कलकोट) 
श्रीदत्त प्रभू(मेंगलोर कर्नाटक), कल्याण देशपांडे (रायबाग), मयुरेश शिखरे(कोल्हापूर), पंडिता पद्मिनीराव(बेंगलोर) यांच्यासह देश-विदेशातील अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. विशेष बाब म्हणजे आणखी काही दिवस हा महोत्सव चालावा यासाठी अनेक कलाकार स्व खुशीने सहभाग घेत आहेत. 
कोरोना महामारीत संपूर्ण विश्व थांबले असताना संगीत जगतात मात्र हि शांतता होऊ नये व घरी बसून सर्वांना उच्चस्तरीय संगीत तेही निशुल्क ऐकता यावे यासाठी विकास पाटील यांनी राबवलेली हि संकल्पना यशस्वी झाली आहे. या उपक्रमासाठी दादासाहेब पाटील, अविनाश पाटील व विकास पाटील हा संपूर्ण परिवार यासाठी निरंतर प्रयत्न करित आहे.  

 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com