केंद्र सरकार राज्य सरकारवर कुरघोडी करतयं : वळसे पाटलांचा आरोप

भारत नागणे
शनिवार, 25 जानेवारी 2020

पंढरपूर (सोलापूर) : कोरेगाव भीमा दंगलीचा तपास राज्य सरकार करत असताना ऐन वेळी केंद्र सरकारने एनआयएकडे तपास दिला आहे. या प्रश्नी आताच केंद्राला कशी काय जाग आली. यापूर्वीच केंद्राने हस्तक्षेप करायला हवा होता, असा सलाव उपस्थित करुन केंद्र सरकार राज्य सरकारवर कुरघोडी करत आहे,असा आऱोप कामगार मंत्री तथा सोलापूरचे पालक मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे केला.

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आज प्रथमच विठ्ठल रुक्मिणी दर्शऩासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनापूर्वी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमाच्या तापस प्रकरणी केंद्र सरकावर टीका केली. देशाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील घरासमोरील सुरक्षा कमी केल्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मंत्री वळसे पाटील म्हणाले, केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कुरघो़डी करत आहे. या प्रकरणी केंद्राने आपली भूमिका बदली आहे. यातूनच केंद्र सरकार राज्य सरकार बाबत दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याने त्यांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अनिता पवार आदी उपस्थित होते. दरम्यान आज पहाटे मंत्री वळसे पाटील यांचे पंढरपुरात आगमन झाले. यावेळी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहराध्यक्ष संदीप मांडवे, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी मंत्री वळसे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The central government was crushing on the state government