यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांच्या बंदला नसणार "यांचा' पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बंदमध्ये सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सहभाग नोंदवू नये, अशा आशयाचा ठराव चेंबरचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी मांडला. त्यास चेंबरचे प्रवक्ता पशुपती माशाळ, संचालक शैलेश बच्चुवार यांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी निर्णय घेऊन यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांचा कोणताही बंद व्यापारी पाळणार नसल्याचे धोरण जाहीर केले.

सोलापूर : यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांचा कोणताही बंद व्यापारी पाळणार नाहीत, असे धोरण चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या प्रस्तावास चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी पाठिंबा दिला.

हेही वाचा - सोलापुरात स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

सर्वानुमते मंजुरी
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या संचालक मंडळातर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या वेळी यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बंदमध्ये सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सहभाग नोंदवू नये, अशा आशयाचा ठराव चेंबरचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी मांडला. त्यास चेंबरचे प्रवक्ता पशुपती माशाळ, संचालक शैलेश बच्चुवार यांनी अनुमोदन केले.

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खून

बंदमधील सहभाग राहील ऐच्छिक
या प्रस्तावास सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्याकडे संपर्क साधून याविषयी विनंती केली. त्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी निर्णय घेऊन यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांचा कोणताही बंद व्यापारी पाळणार नसल्याचे धोरण जाहीर केल्याचे कळविले.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ही संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर तसेच चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड संलग्न संस्था असल्याने वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र बंदमधील सहभाग ऐच्छिक राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber dicision that there will be not involve in any political parties strike