छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक सुशोभिकरणास सुरुवात 

putala.jpg
putala.jpg
Updated on


सोलापूर ः शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुना नाका चौकातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरणास सुरुवात करण्यात आली असून, येत्या आठ महिन्यात हे सुशोभिकरण पूर्ण होणार आहे. 

जुना पुना नाका चौकातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा परिसर हा मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराप्रमाणे सुशोभिकरण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक सामाजिक संघटनांनी मागणी करून निवेदने दिली होती. याचा विचार करून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत पाठपुरावा करून या सुशोभिकरणाच्या कामांसाठी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. नाविन्यपूर्ण योजना 2019-20 या वर्षातील निधी या कामासाठी मंजूर असून, या कामाचे भूमिपूजन 14 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

सध्या असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोणताही बदल न करता आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. याठिकाणी बांधकाम स्वरूपात किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या परिसरात 13 लहान व पुतळ्याच्या पाठीमागे 2 मोठे बुरूज उभारण्यात येणार आहेत. पुतळ्याच्या समोरील बाजूस दोन मोठ्या तोफांची प्रतिकृती उभारण्यात येणार असून, याठिकाणी रंगीबेरंगी लाईटिंग म्हणजे लेझर शो साकारण्यात येणार आहे. 
छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाचा आराखडा वास्तुविशारद मोहोळकर यांनी तयार केला असून, पालिकेचे नगरअभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता सारीका आकुलवार, कनिष्ठ अभियंता शेफाली दिलपाक, टेक्‍निकल सुपरवायझर केसकर हे या कामावर लक्ष ठेऊन काम करून घेत आहेत. 

लवकर काम पूर्ण व्हावे 
अनेकदा निवेदने दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल. सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरवासीय व बाहेरील लोकांसाठी हा परिसर एखादे पर्यटन स्थळासारखे होईल. 
-किरण पवार, शहर समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com