'या' अपार्टमेंटमधील नागरिकांनी स्वत:ला करून घेतले होम क्वारंटाइन

2Pune_records_first_death_ol_0.jpg
2Pune_records_first_death_ol_0.jpg

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांना साथ देण्यासाठी इंद्रधनु अपार्टमेंट येथील रहिवाशांनी स्वतः ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. या रेसिडेन्सीत 350 सभासद वास्तव्यास आहेत. खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून त्यांनी नियमावली तयार केली आहे. 
इंद्रधनु अपार्टमेंट मधील रहिवाशांनी स्वतः पुढाकार घेत कोरोनाबाबत एकत्र विचार केला. सर्व सदस्यांचे आरोग्य सुरक्षित असावे यासाठी विचार करून नियमावली तयार केली. सोसायटीत काही डॉक्‍टर असल्याने त्यांनी या आजाराचे गांभीर्य सदस्यांच्या लक्षात आणून दिले. या आजारात काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती मिळाल्याने सर्वांनी नियमाचे कडक पालन करत त्याची अंमलबजावणी सुरू केली. 

  1. अपार्टमेंटमधील सभासदांनी घरातच थांबावे. फक्त महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर जावे. 
  2. लहान मुलांना बाहेर खेळायला सोडू नये. 
  3. घरातील कचरा आपापल्या फ्लोअरच्या जिन्याजवळ ठेवावा 
  4. कचरेवाल्याला लिफ्ट वापरू न देता कचरा घेऊन जाण्यास सांगावे. 
  5. परगावाहून येणाऱ्या नातेवाइकांना अपार्टमेंटमध्ये प्रवेश बंदी 
  6. घरकाम करणाऱ्या बायका, दूधवाला, भाजीवाला, कुरिअर यांना प्रवेश बंदी 
  7. दूध पाकिटे खालीच साबणाने स्वच्छ धुवून न्यावीत. शक्‍यतो उघडे भांडे वापरू नये. 
  8. लिफ्टमध्ये जाताना सॅनिटायझरने हात धुवूनच जावे. 
  9. लिफ्ट प्रत्येक दोन तासांनी स्प्रेने स्वच्छ करावी. 
  10. पाण्याच्या जारवाल्यांना पूर्ण बंदी 

घरातील सदस्यांसमवेत कॅरम, गाण्याच्या भेंड्या खेळणे 
घरात बसून मुलांसमवेत कॅरम, गाण्याच्या भेंड्या, तसेच कुटुंबासमवेत बसून वेळ घालविणे आवडते. अन्नपदार्थ करून खाणे, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देणे. कुटुंबाला वेळ देण्याचे काम सुरू आहे. 
- माऊली पवार

मेडिकल क्षेत्रातील लेख, पुस्तके वाचण 
घरातील सदस्यांसमवेत वेळ घालविणे तसेच फोनद्वारे नातेवाइकांशी संवाद साधणे. मेडिकल क्षेत्रातील विविध संशोधकांचे लेख, पुस्तके वाचणे. टीव्हीवरील बातम्या पाहणे. 
 - डॉ. प्रेमकुमर झंवर 

आवडणारे अन्नपदार्थ करून खाऊ घालणे 
लॉकडाउनने घरातील सर्व सदस्य घरातच असल्याने त्यांना आवडणारे अन्नपदार्थ करून खाऊ घालणे, टीव्ही पाहणे, कुंटुंबातील सदस्यांशी गप्पा मारणे, संध्याकाळी गॅलरीत उभा राहून शेजाऱ्यांशी गप्पा मारणे. 
-  जयश्री नाव्हकर 

टीव्हीवरी मालिका पाहणे 
मी राजकारात असल्याने आजपर्यंत कधी माझ्या आईला व कुटुंबातील सदस्यांना वेळ देता आला नाही. सध्या सकाळी उठल्यानंतर रामायण, महाभारत पाहणे, मुलांना वेळ देता येत नव्हता. सध्या त्यांच्याशी गप्पा मारणे, अभ्यासाची चौकशी करणे असा दिनक्रम सुरू आहे 
- चेतन नरोटे 

आर्टमेंट मध्ये राहणऱ्यांना दिले स्टीकर 
आम्ही आमच्या अपार्टमेंटची एक नियमावली तयार केली आहे. इंद्रधनुत राहणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या वाहनांवर एक स्टीकर चिटकवले असून त्याच वाहनांना प्रवेश दिला जातो. 
- डॉ. दत्तात्रय कुनगुलवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com