esakal | धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणानेच ! श्री रुपाभवानी मंदिरही दर्शनासाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

2dikshabhumi_0.jpg

पोलिस आयुक्‍तालयाच्या आदेशानुसार...

 • धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही
 • बुध्दविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती तथा स्मारक, भगवान बुध्दांचा पुतळा यांना घरातूनच द्यावी मानवंदना
 • पुतळ्यास माल्यार्पण, बुध्दवंदना तथा प्रार्थना करताना गर्दी होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची घ्यावी दक्षता
 • तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबूकद्वारे उपलब्ध करावी
 • प्रत्यक्षात दर्शन घेणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करावे
 • श्री रुपाभवानी मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल; सर्वांनी सहकार्य करावे

धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणानेच ! श्री रुपाभवानी मंदिरही दर्शनासाठी बंद

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धम्मचक्र परिवर्तन दिन साजरेपणानेच साजरा करावा. त्यावेळी कोणतीही मिरवणू काढण्यासाठी परवानगी असणार नाही, समता सैनिक दलाचा मानवंदना कार्यक्रम, पदयात्रा, धम्मसंस्कार सोहळाही होणार नाही, असे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी आज काढले.

शहरात कोरोनाचा संसर्ग कायम असून या महामारीला हद्दपार करण्याच्या हेतूने नागरिकांनी धम्मचक्र परिवर्तन दिन साधेपणाने साजरा करावा. यासाठी पोलिस आयुक्‍तालयात शनिवारी (ता. 10) पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर, बापू बांगर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, अरुण भालेराव, आनंद चंदनशिवे, समीर नदाफ, लखन भंडारे, पंकज ढसाळ, देवा उघडे, दिपक आठवले, किर्तीपाल घोडकुंबे, विनोद इंगळे, शशिकांत गायकवाड, ऍड. अजय रणशृंगारे, विश्‍वजीत सरवदे आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्‍तालयाच्या आदेशानुसार...

 • धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही
 • बुध्दविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती तथा स्मारक, भगवान बुध्दांचा पुतळा यांना घरातूनच द्यावी मानवंदना
 • पुतळ्यास माल्यार्पण, बुध्दवंदना तथा प्रार्थना करताना गर्दी होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची घ्यावी दक्षता
 • तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबूकद्वारे उपलब्ध करावी
 • प्रत्यक्षात दर्शन घेणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करावे
 • श्री रुपाभवानी मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल; सर्वांनी सहकार्य करावे

दोन- तीन महिने घ्यावी लागेल खबरदारी
शहरातील कोरोना अजूनही संपलेला नाही. दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून कोरोनाची लक्षणे दररोज बदलत आहेत. काहीजण कोरोनामुक्‍त होऊनही त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी आणखी दोन- तीन महिने काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन सर्वांच्या सहकार्यातूनच सोलापूर शहर कोरोनामुक्‍त होईल. 
- बापू बांगर, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर