जीएसटीच्या क्युआरएमपी योजनेची अंमलबजावणी सूरू

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 13 January 2021

जीएसटी करदात्यांना या पुर्वी दर महिन्याला आवश्‍यक ती बिले सादर करून जीएसटी कराच्या भरणा करावा लागत असे. कर भरणा व कागदपत्रे दाखल केली नाही तर प्रतीदिवस शंभर रुपये दंड आकारला जात असे. याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना बसत असे. अनेक अनेक वेळा लांब अंतरावरून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडून बिले मिळण्यास विलंब होतो. बिले नसल्याने जीएसटी भरणा करण्याच्या बाबत अनेक अडचणी येत असत. दंड व व्याजांचा भुर्दंड टाळण्यासाठी सुटसुटीतपणे आता करदात्यांना चार महिन्यांला त्यांच्या जीएसटी व्यवहार करणे शक्‍य होणार आहे.

सोलापूरः जीएसटी करदात्यांसाठी क्‍युआरएमपी (क्वार्टरली रिटर्न मन्थली पेमेंट) योजना आखली आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

हेही वाचाः कोरोनावरील लस आज येणार ! जनजागृतीसाठी घेतली जाणार शिक्षकांची मदत 

जीएसटी करदात्यांना या पुर्वी दर महिन्याला आवश्‍यक ती बिले सादर करून जीएसटी कराच्या भरणा करावा लागत असे. कर भरणा व कागदपत्रे दाखल केली नाही तर प्रतीदिवस शंभर रुपये दंड आकारला जात असे. याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना बसत असे. अनेक अनेक वेळा लांब अंतरावरून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडून बिले मिळण्यास विलंब होतो. बिले नसल्याने जीएसटी भरणा करण्याच्या बाबत अनेक अडचणी येत असत. दंड व व्याजांचा भुर्दंड टाळण्यासाठी सुटसुटीतपणे आता करदात्यांना चार महिन्यांला त्यांच्या जीएसटी व्यवहार करणे शक्‍य होणार आहे. सध्या तरी या योजनेत सहभागी झालेल्या करदात्यांची उलाढाल मर्यादा जास्त असली तरी पुढील काळात कमी उलाढाल असणाऱ्या करदात्यांना देखील दिलासा मिळू शकतो. 

योजनेची वैशिष्ट्ये 
- पाच कोटी रुपयापर्यंत उलाढाल असणारे करदाते एकाचवेळी जीएसटीआर-1 व जीएसटीआर-3 बी क्वार्टरली हे फॉर्म भरू शकतात. 
- जे करदाते चलानच्या 35 टक्के रक्कम महिन्याच्या 25 तारखेपर्यंत भरतील त्यांना व्याज आकारले जाणार नाही 
- दर महिन्याला जीएसटीआर-2ए फॉर्म भरावा लागेल. 
- साध्या एसएमएसद्वारे योजनेत सहभागाची सोय 

सोलापूर विभागाच्या अंतर्गत योजनेस पात्र करदाते 
- सोलापूर ः 18495 
- बार्शी ः 3478 
- उस्मानाबाद ः 4841 

अंमलबजावणी प्रभावी व्हावी 
योजना आताच सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ पात्र करदात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने झाली पाहीजे. करदात्यांना योजनेच्या लाभाचा अनुभव आल्यानंतर योजनेचे यश अवलंबून असणार आहे. 
- श्रीनिवास भुतडा, चाटर्ड अकाऊंटंट, सोलापूर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of implementation of GST's QRMP scheme