esakal | महाविकास आघाडीच्या बैठकीत सोलापूरमध्ये कॉंग्रेसचा गोंधळ 
sakal

बोलून बातमी शोधा

gondhal.jpg

बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या फलकावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो का नाही लावला? म्हणून शिंदे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभेच्या सुरुवातीला गोंधळ होत असल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला होता. कॉंग्रेसचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजविल्यानंतर बैठक पूर्ववत सुरू झाली. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत सोलापूरमध्ये कॉंग्रेसचा गोंधळ 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. सोलापुरातील हेरिटेज लॉन्स मध्ये सुरू असलेल्या महा विकास आघाडीच्या बैठकीमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. 

हेही वाचाः कार्तिकी काळात एसटी वाहतुक सेवा सुरू राहणार 

बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या फलकावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो का नाही लावला? म्हणून शिंदे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभेच्या सुरुवातीला गोंधळ होत असल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला होता. कॉंग्रेसचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजविल्यानंतर बैठक पूर्ववत सुरू झाली. 
राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले मी निघून जाऊ का ? 
या फलकावर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नाही याबद्दल मी स्वतः माफी मागतो. राष्ट्रवादीच्यावतीनेही माफी मागण्यात आली आहे. हा विषय आता इथेच थांबवा आणि बैठक सुरू राहू द्या, बैठक करायची का नाही? का मी इथून निघून जाऊ? असा सवाल राज्यमंत्री बंटी पाटील यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचारताच कार्यकर्ते शांत झाले आणि बैठक पूर्ववत सुरू झाली.