कार्तिकी यात्रा काळात एसटी प्रवाशी वाहतूक सुरूच राहणार 

भारत नागणे
Saturday, 21 November 2020

यात्रा काळात एसटीची प्रवाशी वाहतूक ही पुणे रोडवरील चंद्रभागा बस स्थानकावरून सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली. 
कोरोनामुळे आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक पध्दतीने कार्तिकी यात्रा साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने भाविकांना केले आहे. यात्रा काळात भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, असेही जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचार बंदी लागू केली. मठांमध्ये राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाहेर गावचे भाविक यात्रा काळात पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय नाकाबंदीचे नियोजन केले आहे. 

पंढरपूर(सोलापूर): कोरोनाचा वाढता संसर्ग विचार घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदाची कार्तिकी यात्रेसाठी निर्बंध घातले आहेत. त्यातच 25 व 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात परिसरातील आठ गावांमध्ये संचार बंदी लागू केली आहे. दरम्यान, पंढरपुरातून एसटीची प्रवाशी वाहतूक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचाः लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा ता.27 डिसेंबरला 

यात्रा काळात एसटीची प्रवाशी वाहतूक ही पुणे रोडवरील चंद्रभागा बस स्थानकावरून सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली. 
कोरोनामुळे आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक पध्दतीने कार्तिकी यात्रा साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने भाविकांना केले आहे. यात्रा काळात भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, असेही जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचार बंदी लागू केली. मठांमध्ये राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाहेर गावचे भाविक यात्रा काळात पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय नाकाबंदीचे नियोजन केले आहे. 

हेही वाचाः अन्नदानाच्या चळवळीत लोकांनी पुढे यावे ः अभिनेते सुमित पुसावळे यांचे आवाहन 

त्यातच रविवारी (ता.22) रात्री 12 ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजे पर्यंत पंढरपूरकडे येणारी आणि बाहेर जाणारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु आज एसटी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यात्रा काळात एसटीची प्रवाशी वाहतूक सुरू ठेवण्यात संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 
दरम्यान, प्रवाशी वाहतूक ही कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून केली जाणार आहे. शासनाकडून आणि एसटी विभागाकडून आलेल्या सुचना नुसार पुढील कार्यवाही केली जाईल असेही आगार प्रमुख श्री.सुतार यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST passenger traffic will continue during Karthiki Yatra