कोरोनामुळे खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर कुऱ्हाड 

प्रशांत देशपांडे 
शुक्रवार, 29 मे 2020

ऑनलाइन क्‍लासेसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेसुद्धा निदर्शनास येत आहे. 16 मार्चपासूनच शिकवण्या बंद ठेवल्यामुळे शिक्षकांना शेवटी मिळणारी फी मिळाली नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे दैनंदिन घरखर्च, काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, काहींच्या आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी सरकारने मागेल त्या संघटनेच्या शिक्षकांना मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही अटीशिवाय कर्जपुरवठा करावा. 

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे सोलापूरसह राज्यातील खासगी कोचिंग क्‍लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोचिंग क्‍लास चालक आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद आहे, मात्र शिकवणी वर्गाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, बॅंकांचे हप्ते, घरखर्च चालूच आहे. आता, मात्र खासगी शिक्षकांना कठीण जात आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या खासगी शिकवणी घेणाऱ्यांना शासनाने मदत करावी. 
शैक्षणिक सत्राच्या शेवटी लॉकडाउन सुरू झाल्यामुळे एप्रिल महिन्यात मिळणारी दुसऱ्या टप्प्यातील फीसुद्धा वसूल झालेली नाही. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या फीवर आतापर्यंत शिक्षकांनी संसाराचा गाढा ओढला आहे, परंतु आता मात्र खासगी शिक्षकांना कठीण जात आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सोलापूरसह राज्यभरातील खासगी शिकवणी वर्ग चालकांना शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे. 

हेही वाचा : धक्कादायक प्रकार : सोलापुरात अंत्यविधी आल्यानंतर समजले मृत व्यक्ती होती कोरोना बाधित 

सोलापुरात ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात. ग्रामीण भागातील 90 टक्के पालकांकडे स्मार्टफोन नाही. एखाद्या पालकाजवळ फोन असतो, मात्र नेटवर्क नसते. तसेच या काळात ग्रामीण भागात रोजगार नसल्याने फोन घेऊन रिचार्ज मारणे अशक्‍यप्राय आहे. त्यामुळे ऑनलाइन क्‍लासेस उत्पन्नाचे स्रोत बनू शकत नाहीत. ऑनलाइन क्‍लासेसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेसुद्धा निदर्शनास येत आहे. 16 मार्चपासूनच शिकवण्या बंद ठेवल्यामुळे शिक्षकांना शेवटी मिळणारी फी मिळाली नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे दैनंदिन घरखर्च, काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, काहींच्या आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी सरकारने मागेल त्या संघटनेच्या शिक्षकांना मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही अटीशिवाय कर्जपुरवठा करावा. 

हेही वाचा : आरोग्यदायी रानभाज्यंचे महत्व तुम्हाला माहित आहे काय? 

महाराष्ट्रातील कोचिंग क्‍लासेस साठी सरकारने पॅकेज जाहिर करावे 
आज संपूर्ण महाराष्ट्रातील कोचिंग क्‍लासेस संचालक आर्थिक अडचणीत आहेत. सरकारने आमच्यासाठीसुद्धा पॅकेज जाहीर करावे. नियमावलीनुसार क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. 
- प्रा. योगीराज अरसोड, राज्य कोअर कमिटी सदस्य, 
महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन 


जसे क्‍लासरूममध्ये शिकविण्यात येते, तसे ऑनलाइनवर येत नाही 
सध्याच्या ऑनलाइन क्‍लासेसवर पालक व विद्यार्थी नाराज आहेत. जसे क्‍लासरूममध्ये शिकविण्यात येते, तसे ऑनलाइनवर येत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. कारण, काही विद्यार्थी घरी अभ्यास करत नाहीत, त्यामुळे आम्हाला काही नियम, अटी घालून जूनमध्ये क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. 
- प्रा. सुनील कामतकर, कामतकर क्‍लासेस 

 शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे 
सध्या बारावीच्या पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जवळ येत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या नियमांचे पालन आणि विद्यार्थी संख्येवर नियंत्रण ठेवून क्‍लास सुरू करण्याची परवानगी द्यावी. 
- प्रा. शशिकांत कलबुर्गी, कलबुर्गी क्‍लासेस  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona axes private tutoring teachers