भाद्रपद पोळा सणासाठी कोरोना संकटाने शेतकऱ्यांचा उत्साह कमी 

राजाराम माने
Wednesday, 16 September 2020

सर्जा- राजाला सजवण्यासाठी लागणारे साहित्य व्यापाऱ्यांनी दुकानात विक्रीसाठी आणले आहे. परंतु, कोरोना महामारीच्या संसर्गामुळे व ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसत नाही. तरीही गोंडे, मोरणी, घागरमाळ, झालर रंगवण्यासाठी रंगपट्‌ट्‌पाया फुगे आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. मात्र यासाठी ग्राहक अल्प प्रमाणात आहे असे विक्रेते ज्ञानेश्वर शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

केतूर(सोलापूर)ः बैलपोळा सण उद्यावर शुक्रवार (ता.17) आला असतानाही केतूर (ता.करमाळा) परिसरात व बाजारपेठेत फारसा उत्साह दिसून येत नाही. कोरोना महामारी संकटाने शेतकऱ्यांचा वर्षातील मोठा बैलपोळा सण साजरे करण्याचा आनंद मात्र हिरावून घेतला आहे. संपूर्ण करमाळा तालुक्‍यात श्रावणी पोळा साजरा होतो परंतु पश्‍चिम भागात मात्र भाद्रपद पोळा साजरा केला जातो. 

हेही वाचाः कलापिनी जागतिक संगीत महोत्सवाची शतकोत्तरी 

सर्जा- राजाला सजवण्यासाठी लागणारे साहित्य व्यापाऱ्यांनी दुकानात विक्रीसाठी आणले आहे. परंतु, कोरोना महामारीच्या संसर्गामुळे व ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसत नाही. तरीही गोंडे, मोरणी, घागरमाळ, झालर रंगवण्यासाठी रंगपट्‌ट्‌पाया फुगे आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. मात्र यासाठी ग्राहक अल्प प्रमाणात आहे असे विक्रेते ज्ञानेश्वर शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचाः अबब ! सोलापूर मार्केट यार्डातील दुकान फोडून चोरट्यांनी पळवला लसूण 

शुक्रवार (ता.17) रोजी पोळा सण असल्याने परिसरातील केतूरसह हिंगणी, पारेवाडी, दिवेगव्हाण, कोर्टी, सावडी, देलवडी, जिंती, टाकळी, रामवाडी, कोंढार, चिंचोली, कुंभारगाव, पोमलवाडी, वाशिंबे, सोगाव, कात्रज, गुलमोहरवाडी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने गुरांना सजवण्यासाठी साहित्य खरेदी करतात. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार कमीत कमी साहित्य खरेदी करून शेतकरी जात आहेत. पोळा सणाच्या आदल्या दिवशीच गुरुवारी बैलाची खांदेमळणी शेतकरी करतात व गुरांना धुतले जाते. यावर्षी मात्र कोरोनाने शेतकऱ्यांचा हा आनंदही हिरावून घेतला आहे. साधेपणानेच बैलपोळा साजरा साजरा करणार असल्याचे रामचंद्र कोकणे, सुधीर कोकणे (केतूर) तसेच भरत बाबर, तुकाराम दडस (हिंगणी), हनुमंत भोपते (पोमलवाडी), गणेश खुळे, आजिनाथ निकत (गुलमोहरवाडी) यांनी "सकाळ"ला सांगितले. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crisis lowers farmers' enthusiasm for Bhadrapad Pola festival