कोरोना : आमचा उदरनिर्वाह होणार कसा... कोणाचा आहे प्रश्‍न वाचा

Corona effect on Maid women
Corona effect on Maid women

सोलापूर : घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. दुसऱ्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिला आजवर उपेक्षित राहिले आहेत. त्यात कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या कामावरही त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपले घर कसे चालणार... आपला उदरनिर्वाह कसा होणार... असा प्रश्‍न या महिलांना भेडसावत आहे. 
घर काम करणाऱ्या महिला त्यांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यातच काही महिला लांबून जेवण बनवण्यासाठी किंवा घरकामासाठी जात असतात. या महिला वेगवेगळ्या भागात फिरून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या अडचणी वैयक्तिक आणि घरगुती असल्या तरी त्या कोणीच ऐकून घेत नाहीत यावर मार्गदर्शन होत नाही. काही घरगुती काम करणाऱ्या महिलांना कामासाठी बोलवण्यात आले आहे. परंतु घरामध्ये पाऊल टाकायचे आहे व त्याचा वापर करून घेऊन मगच घरांमध्ये यायला अशी सांगितले आहे. घरगुती अडचणी आणि आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिला इतरांच्या घरी जेवण बनवण्यासाठी धुणी-भांडी घासण्यासाठी जातात. पण काही दिवसापासून कोरोना व्हायरसमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना घरीच बसावे लागत आहे. त्यामुळे काही नागरिकांनी घरीच बसण्यास सांगितले असून नेमके काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. 
या कोरोनाव्हायरस मुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने महिलांनी सांगितले. 


पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला सतावत आहे
गेल्या काही दिवसापासून कोरोनाव्हायरस मुळे आमच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी जातो. त्या ठिकाणी आम्हाला काही दिवस सुट्टी घेण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आता आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला सतावत आहे. 
- अनिता रोहिटे 


 बऱ्याच वर्षापासून
बऱ्याच वर्षापासून मी घरगुती काम करण्यासाठी जाते. आता सध्या कोरोना व्हायरस सुरू आहे तरीही कामास सुट्टी न देता, तरीही आम्हाला कामावर येण्यास सांगितले आहे. त्यांच्या घरात गेल्यावरही हॅन्ड वॉश आणि सॅनीटायझरचा वापर करूनच घरात येण्यास परवानगी देत आहेत. 
- सुनंदा काटगावकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com