कोरोनामुळे निधी खर्चात अडचणी ! मुदतवाढीची जि.प.उपाध्यक्षाची मागणी

हुकूम मुलाणी 
Sunday, 28 February 2021

सध्या कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कमी मनुष्यबळात असताना देखील मोठ्या नेटाने काम करत आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा वार्षिक योजनेतील 2019-20 मधील आरोग्य विभागाकडील बांधकाम विस्तारीकरण मधील अखर्चित रक्कम खर्च करण्यास कोरोनामुळे अडचणी निर्माण झाली आहे. यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
  
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरोग्य विभागाकडील जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम विस्तारीकरण लेखाशिर्ष 2210-6725 मधून र.रु. 917.00 लक्ष व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम विस्तारीकरण लेखाशिर्ष 3451-2432 मधून र.रु. 700.00 लक्ष प्राप्त आहेत. मंजूर रक्कमेच्या दीडपटीने प्रशासकीय मंजूरीस आरोग्य समितीने मान्यता दिली आहे. सदर रक्कम मार्च 2021 पर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. परंतू मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादूर्भावामुळे काही महिने कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती कमी असल्यामुळे तसेच पदवीधर / शिक्षक मतदार संघ निवडणूक आचारसंहिता व तदनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका आचारसंहिता अशा प्रक्रियेमुळे एक वर्ष कालावधीत विकास कामे व दिलेली प्रशासकीय मंजुरीची कामे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर कामे पूर्ण झाली नाहीत. 

कराड-पंढरपूर रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण जागीच ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक

सध्या कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कमी मनुष्यबळात असताना देखील मोठ्या नेटाने काम करत आहे. परंतु उपलब्ध निधी आरोग्य व्यवस्थित खर्च करण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास त्यामुळे यापुढील काळात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्राप्त झालेल्या निधी खर्च करणे व त्यातून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या निधी शिल्लक असल्याने खर्च करण्यास सन 2021-2022 पर्यंत एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी. जिल्हा नियोजन समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी केली असल्याने त्यास खास बाब म्हणून मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी निवेदनात नमूद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona has caused difficulties in spending the unspent amount in the construction expansion from the health department