शहरामध्ये कोरोना लॉकडाऊनचा पक्षांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

एरवी पक्ष्यांचा किलबिलाट सूर्याच्या कोवळ्या किरणांबरोबर सुरू व्हायचा. वेगवेगळ्या जातीची, वेगळ्या रंगाची अनेक पक्षी पहावयास मिळायची. कुठे झाडांच्या फांदीवर तर कुठे तळ्यात, कुठे रस्त्यावर पक्षांना पाहणे आणि कॅमेरात टिपणे हे चित्र काही दिवसांपासून कमी झाले आहे.

सोलापूर : कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम होऊन शहरातील ध्वनिप्रदूषण घट झाले आहे.  वातावरण शांत असून पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर काही दिवसांपासून पूर्ण शहर थांबले आहे. परंतु सध्या खायला काही मिळत नसल्यामुळे काही पक्षी मरण पावत असल्याचे दिसत आहेत. त्यात मानवाचा संचार कमी झाल्याने पक्षी आणि प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येत आहे. 
हेवी वाचा : खासगी डॉक्‍टरांची सेवा सर्वोपचार रुग्णालयात वर्ग 
एरवी पक्ष्यांचा किलबिलाट सूर्याच्या कोवळ्या किरणांबरोबर सुरू व्हायचा. वेगवेगळ्या जातीची, वेगळ्या रंगाची अनेक पक्षी पहावयास मिळायची. कुठे झाडांच्या फांदीवर तर कुठे तळ्यात, कुठे रस्त्यावर पक्षांना पाहणे आणि कॅमेरात टिपणे हे चित्र काही दिवसांपासून कमी झाले आहे.
पक्षीमित्र अरविंद कुंभार म्हणाले, शहरातून पक्षी हद्दपार झाले आहेत. एरवी खानावळ, ढाबे, हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न पक्षांची गुजरान करत असायचे. त्यात सध्या शहरातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावेळी उरलेले अन्नही मिळत नसल्यामुळे पक्ष्यांना अन्नाची कमतरता जाणवत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्यामुळे पक्षांना कोणत्याही प्रकारचे अन्न खायला मिळत नाहीये. त्यामुळे पक्ष्यांची उपासमार सुरू आहे. कोरोनामुळे शहराकडील अनेक माणसं खेड्याकडे वळाली आहेत. त्याच पद्धतीने पक्षीही शहराकडून गाव, वाड्या-वस्त्यांकडे वळाले आहेत. यामुळे आता पक्षी रानातील द्राक्षांची खराब झालेली मनुके खाण्यासाठी गर्दी करत आहेत. पक्ष्यांना ध्वनिप्रदूषणाचा खूप त्रास होतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे का होईना पक्षांना मोकळा श्वास घेता येत आहे त्यांना नेहमी होणाऱ्या वाहनांचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे पक्षांना सध्या मोकळा स्वास्थ मिळाले आहे. तसेच ध्वनीप्रदूषण कमी झाले असून स्वच्छ हवा ही पक्ष्यांना मिळत आहे, असेही ते म्हणाले.
कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे पक्षी खाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. शहरातील वर्दळ आणि माणसांचा वावर कमी झाल्यामुळे पक्षी घरांमधल्या गॅलरी मधूनही सर्वांना दिसू लागले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे माणूस घरातच बंदिस्त झाला. त्यामुळे वातावरणात चांगले बदल पाहायला मिळत आहे. प्रदूषण कमी झाल्याने पक्षांना शुद्ध व आल्हाददायक वातावरणात मुक्त संचार करता येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा : वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर शहरात पाच रिक्षा
पक्षी घेताहेत मोकळा श्वास

लाॅकडाऊन मुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. सर्वत्र बंदच आहे. उद्योगधंदे आणि वाहने बंद असल्यामुळे प्रदूषणही कमी झालेला आहे. या साऱ्या संकटाच्या काळात पक्षी मात्र मोकळा श्वास घेत आहेत. दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट, पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. या दिवसात मानवालाही बंदी असली तरी या मुक्या जीवांना या मोकळ्या वातावरणात स्वच्छंद फिरण्यासाठी एक ऊर्जा मिळाली हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona lockdown in the city affects the bird