सामूहिक दुष्कर्मप्रकरणी चौघांचा फेटाळला जामीन; महाविद्यालयीन विद्यार्थिनीची रिक्षाचालकाशी झाली होती ओळख 

तात्या लांडगे 
Tuesday, 11 August 2020

पीडित मुलगी ऑगस्ट 2019 पासून विजयपूर रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करीत होती. त्या वेळी प्रतापनगर तांडा येथील सचिन श्रीकांत राठोड याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांनी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सचिनने त्या मुलीला बाळे येथील लॉजवर नेऊन दुष्कर्म केले. एके दिवशी सचिनने तिला मारुती मंदिराजवळ सोडले. राजवीर याने तिला रिक्षात बसवून घरी घेऊन जाताना वाटेत दुष्कर्म केले. काही दिवसांनी मुलगी चालत जात असताना प्रवीण राठोड याने तिला स्टॅंडला सोडतो म्हणून रिक्षात बसवले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. अक्षय व सतीश यांनी तिला प्रवीणने बोलावले म्हणून रिक्षात बसविले आणि कुमठ्याजवळील जंगलात आळीपाळीने दुष्कर्म केले. 

सोलापूर : विजयपूर रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीची रिक्षाचालक सचिन राठोड याच्याशी ओळख झाली. त्यानंतर पत्नीचा दर्जा देतो, म्हणून त्याने ओळख वाढविली आणि शरीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही तिच्यासोबत दुष्कर्म केले. या प्रकरणी पीडित मुलीने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील पाच आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फेटाळला. 

हेही वाचा : बससेवेचा निर्णय फसला! पहिल्याच दिवशी 40 हजारांचा खर्च अन्‌ उत्पन्न "एवढेच' 

पीडित मुलगी ऑगस्ट 2019 पासून विजयपूर रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करीत होती. त्या वेळी प्रतापनगर तांडा येथील सचिन श्रीकांत राठोड याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांनी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सचिनने त्या मुलीला बाळे येथील लॉजवर नेऊन दुष्कर्म केले. एके दिवशी सचिनने तिला मारुती मंदिराजवळ सोडले. राजवीर याने तिला रिक्षात बसवून घरी घेऊन जाताना वाटेत दुष्कर्म केले. काही दिवसांनी मुलगी चालत जात असताना प्रवीण राठोड याने तिला स्टॅंडला सोडतो म्हणून रिक्षात बसवले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. अक्षय व सतीश यांनी तिला प्रवीणने बोलावले म्हणून रिक्षात बसविले आणि कुमठ्याजवळील जंगलात आळीपाळीने दुष्कर्म केले. 

हेही वाचा : "महाविकास'ची अजब तऱ्हा... महाराष्ट्रात दोस्ती, सोलापुरात कुस्ती 

मुलीने सचिन राठोड, सतीश जाधव, दिनेश ऊर्फ परशुराम राठोड, गौरव विलास भोसले, किरण विजयकांत भरले यांच्यासह अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्वांना अटक केली. त्यातील सचिन, सतीश, दिनेश ऊर्फ परशुराम आणि गौरव भोसले यांनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले. तर संशयित आरोपींतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. ए. एन. शेख, ऍड. एच. आर. मुसळे, ऍड. एस. पी. पवार यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court rejects bail pleas of four in tyranny case