#Crime : रेल्वे प्रवासात तिच्यासाठी धावले पोलिस! कारण..

#Crime : रेल्वे प्रवासात तिच्यासाठी धावले पोलिस! कारण..

सोलापूर : उद्यान एक्‍स्प्रेसमधील एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची रात्रीच्यावेळी छेड काढली. ही घटना कलबुर्गी परिसरात घडली. हा प्रकार महिलेच्या मुंबईतील नातेवाइकाने ट्‌वीट केल्यानंतर समोर आला. याप्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

गड्डा यात्रेत स्वच्छता अभियानाला प्रबोधनाची जोड; सकाळचा उपक्रम 

चित्रपट निर्मात्याची जवळची नातेवाईक

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी उद्यान एक्‍स्प्रेसमध्ये एसी कोचमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाच्या बाहेर बसलेल्या चार तरुणांनी महिलेची छेड काढली. ती महिला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची जवळची नातेवाईक असल्यामुळे रात्रीच हे प्रकरण थेट रेल्वेमंत्रालयापर्यंत गेले.

सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खून 

छेड काढणारे तरुण निघून गेले

महिलेच्या मुंबईतील नातेवाइकाने रेल्वे प्रवासात घडलेल्या घटनेबाबत ट्‌विट केले. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून थेट सोलापूरच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांना विचारणा करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे आरपीएफ विभागीय सूरक्षा आयुक्त मिथून सोनी यांना घटनेची माहिती कळताच पोलिसांनी रेल्वे डब्यात जाऊन चौकशी केली. तोवर छेड काढणारे तरुण निघून गेले होते. या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे आयुक्त सोनी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com