4Maha_20Police_35.jpg
4Maha_20Police_35.jpg

वाहतूक पोलिसाच्या पायाचे मोडले हाड ! खान चाचा हॉटेल मालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा 

सोलापूर : सात रस्ता परिसरातील खानच्या हॉटेलमध्ये रात्री साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास पार्टी सुरू होती. उस्मानाबाद होऊन सोलापुरात उशिरा आलेल्या अमोल सुरेश बेगमपूरे यांनी त्यांच्या चुलत भावाला भूक लागल्याने खान चाचा हॉटेलमध्ये जेवण मागितले. हॉटेल मालकाने जेवण देण्यास सांगूनही बेगमपूरे यांना तिथून हाकलून देण्यात आले. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर हॉटेलचे मालक सलमान व रेहान खान यांच्यासह अन्य दहा साथीदारांनी जीवे ठार मारण्याच्या हेतूने बेगमपूरे व त्यांच्या चुलत भावास लाकडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या डाव्या पायाच्या नडगीचे हाड मोडले. याप्रकरणी बारा जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बेगमपूर ए यांच्या चुलत बहिणीच्या किडनीवर सूज आली असून तिला निमोनियाचा त्रास आहे. त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, ही माहिती मिळताच बेगमपूरे हे त्यांच्या चुलत भावासह चुलत बहिणीला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करून ते दोघेही रात्री साडेदहाच्या सुमारास सोलापुरात आले. तुलाच भावाला भूक लागल्याने त्या दोघांनीही परिसरातील हॉटेल बंद असल्याने खान चाचा हॉटेल गाठले. त्याठिकाणी पार्टी सुरू असल्याने त्यांनी जेवण मागितले. त्यावेळी हॉटेल मालकाने सलमान व रेहान यांना आवाज देऊन बेगमपुरे यांना पार्सल जेवण देण्यास सांगितले. मात्र, त्या दोघांनीही बेगमपुरे यांना तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी आपण पोलिस असल्याचे सांगून भूक लागली असून जेवण द्यावी, अशी विनंती केली. तरीही सलमान व रेहान यांनी 'तू पोलीस हुआ तो क्‍या चल बाहर निकल' असे म्हणत बेगमपुरे यांच्या चुलत भावाचा हाताने मारहाण करून बाहेर काढले. त्यानंतर ही घटना घडली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. 



पोलिस आयुक्‍त म्हणाले...

  • खान चाचा यांच्या मुलाविरुध्द यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत
  • ट्राफिक पोलिस व त्याचा नातेवाईक परगावाहून आल्याने त्यांच्याकडे काठ्या आल्याच कुठून
  • वाहतूक पोलिसांकडे काठ्या नसतात; अमोल बेगमपुरे याच्या पायाचे मोडले हाड
  • खान यांच्या मुलाच्या अंगावरील वळ आडवे असल्याने ते संशयास्पद
  • सलमान खान याच्या अंगावरील वळाची होणार वैद्यकीय तपासणी; सीसीटिव्ही पुटेज घेतले
  • शहरात किती वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी आहे; एवढा वेळ हॉटेल कसे सुरु ठेवले याचाही तपास

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com