बॅंकामध्ये रकमेच्या व्यवहारासोबत कर्ज वाटप सुरू झाल्याने पुन्हा वाढतेय गर्दी

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 5 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची साधने नसल्याने बॅंकेतील रकमा काढून घेण्यासाठी गर्दी करावी लागली होती. त्या काळात बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा कमी असल्याने या गर्दीमध्ये अधिकच भर पडली होती. त्यावेळी पैसे काढणे व भरणे एवढेच व्यवहार सूरू होते. इतर सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. या महिन्यापासून अनलॉकच्या काळात बॅंकाचे कामकाज दिवसभरासाठी सूरू करण्यात आले. 

सोलापूरः अनलॉकमध्ये नियमित रकमांची देवाण-घेवाणीसोबत कर्ज वाटपाची कामे सुरू झाल्याने बॅंकांमध्ये पुन्हा एकदा गर्दी दिसू लागली आहे. लॉकडाउनप्रमाणे आताही मोठ्या संख्येने होणारी ग्राहकांची गर्दी बॅंकाच्या हाताबाहेर जात आहे. 

हेही वाचाः अगोदर ऍक्‍शन प्लॅन मग सोलापूरचा लॉकडाउन 

लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची साधने नसल्याने बॅंकेतील रकमा काढून घेण्यासाठी गर्दी करावी लागली होती. त्या काळात बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा कमी असल्याने या गर्दीमध्ये अधिकच भर पडली होती. त्यावेळी पैसे काढणे व भरणे एवढेच व्यवहार सूरू होते. इतर सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. या महिन्यापासून अनलॉकच्या काळात बॅंकाचे कामकाज दिवसभरासाठी सूरू करण्यात आले. 

हेही वाचाः पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप 

बॅंकामध्ये गर्दी कमी होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात बॅंकेत गर्दी वाढली आहे. शहरात जनधन योजनेच्या अंतर्गत एकूण बॅंक ग्राहकांची संख्या तीन लाखाच्या आसपास आहे. या खाते धारकांच्या खात्यावर शासनाकडून 500 रुपयांचे तीन हफ्ते जमा झाले. पैशाची चणचण असल्याने हे लाभार्थी खात्यात पैसे विचारण्यासाठी बॅंकेत रांगा लावत राहिले. पैसे घेण्यासाठी तीन वेळा बॅंकेत आले. त्यामुळे गर्दी न करण्याच्या काळात देखील लाभार्थीची संख्या कमी झाली नाही. हे सर्व ग्राहक मोबाईलवर कोणतही व्यवहार ऑनलाइन पध्दतीने करू शकत नव्हते. सेवानिवृत्तीधारक, छोटे व्यावसायिक व नियमीत बॅंक ग्राहकांची संख्या कायम वाढत राहिली. बहुतेक ग्राहकांचा ऑनलाइन व्यवहारावर विश्‍वास नाही. त्यांना मोबाईवर आर्थिक व्यवहार करता येत नसल्याचे आढळून आले. या सोबत तीन महिन्याचे कर्ज वसूलीची मूदत संपल्याने आता ती कामे देखील सूरू होत आहेत. 

ग्राहकाच्या सुरक्षेच्या उपाययोजना 
आम्ही सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स व इतर सुविधा देऊन कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांना या सेवा दिल्या जात आहेत. मात्र, ग्राहकांकडून इतर ऑनलाईन किंवा पे पॉईंटचे पर्याय कमी प्रमाणात वापरल्याने अडचण होत आहे. 
- काशिनाथ बिराजदार, शाखाधिकारी, औद्योगीक वसाहत शाखा, एसबीआय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds are on the rise again as loan disbursements start with cash transactions in banks