शिरवळकर फडाचे मालक दादामहाराज शिरवळकर यांचे निधन 

Dhondopant Maharaj
Dhondopant Maharaj

पंढरपूर (सोलापूर) : (वै.) गंगूकाका शिरवळकर फडाचे मालक ह. भ. प. धोंडोपंत (दादा) महाराज शिरवळकर वय (57) यांचे रात्री साडेअकराच्या सुमारास निधन झाले. 

जगद्‌गुरू तुकोबारायांच्या गाथा भजनाची सेवा व परंपरागत वारकरी भजन यासाठी दादामहाराज हे संप्रदायातील लहानथोरांना परिचित होते. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त झाले असतानाही हातात काठीचा आधार घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी आपली भजनाची व कीर्तनाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली. 
"पडता जडभारी। नेमा न टळे निर्धारी।'। या न्यायाने त्यांनी संप्रदायातील आपल्या सेवा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळल्या. काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 
(वै.) दादा महाराज यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, मुली व हजारोंचा फडातील शिष्यसमुदाय आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com