बाललैंगिक अत्याचारप्रकरणी देगावच्या युवकावर गुन्हा दाखल 

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी देगावच्या युवकावर गुन्हा दाखल 

मोहोळ : "मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, त्यामुळे तुझ्यासोबत मला फोटो काढू दे,' असे म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिचे फोटो काढले व त्यानंतर महिन्याभराने मित्राच्या मोबाईलवरून ते फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी देगाव (ता. मोहोळ) येथील युवकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोहोळ पोलिसांनी संशयित किरण मुळे याला अटक करून सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
गेल्या दीड महिन्यापूर्वी देगाव (ता. मोहोळ) येथे एका अल्पवयीन मुलीला गावातील एका ठिकाणी थांबवून, "तुझ्यासोबत मला मैत्री करायची आहे, त्यामुळे आपण दोघं एकत्र फोटो काढू, तू मला फोटो काढू न दिल्यास तुला ठार मारीन' अशी धमकी देऊन भाऊसाहेब अंकुश आतकरे याने पीडित मुलीसोबत फोटो काढला व तेथून निघून गेला. त्यावेळी पीडित मुलीने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी घरातील व गावातील नागरिकांनी आतकरे याच्या घरी जाऊन या प्रकरणाचा जाब विचारला. त्यावेळी आतकरे याने उलट पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दम दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेले कुटुंब गप्प बसले. त्यानंतर रविवारी (ता. 19) भाऊसाहेब आतकरे व त्याचा मित्र किरण मुळे यांनी पीडित मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावेळी पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती झाल्याने त्यांनी तत्काळ मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहोळ पोलिसांनी संशयित किरण मुळेला अटक करून सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलिस हवालदार विलास रणदिवे तपास करीत आहेत. 
 महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com