esakal | शहरातील मृतांची संख्या साडेचारच्या उंबरठ्यावर! आज 77 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

2Copy_20of_20coronavirus_test_20positive_26.jpg

ठळक बाबी...

  • शहराची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक अन्‌ टेस्टिंग केवळ 71 हजार 565
  • आज शहरातील 618 संशयितांची झाली टेस्ट; 77 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
  • शहरातील 70 रुग्ण बरे होऊन परतले घरी; आतापर्यंत सहा हजार 194 रुग्ण झाले बरे
  • शहरात आज एका रुग्णाचा मृत्यू; मृतांची संख्या आता 442 झाली
  • शिवगंगा नगर भाग- तीन (नई जिंदगी) येथील 45 वर्षीय महिलेचा कोरोने घेतला बळी

शहरातील मृतांची संख्या साडेचारच्या उंबरठ्यावर! आज 77 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता सात हजार 440 झाली असून मृतांची संख्या आता 442 झाली आहे. आज (शनिवारी) शहरात 77 नवे रुग्ण आढळले असून एका 45 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ठळक बाबी...

  • शहराची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक अन्‌ टेस्टिंग केवळ 71 हजार 565
  • आज शहरातील 618 संशयितांची झाली टेस्ट; 77 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
  • शहरातील 70 रुग्ण बरे होऊन परतले घरी; आतापर्यंत सहा हजार 194 रुग्ण झाले बरे
  • शहरात आज एका रुग्णाचा मृत्यू; मृतांची संख्या आता 442 झाली
  • शिवगंगा नगर भाग- तीन (नई जिंदगी) येथील 45 वर्षीय महिलेचा कोरोने घेतला बळी

वर्धमान नगर (भवानी पेठ), पाच्छा पेठ (कुचन नगर), इंद्रधनू अपार्टमेंट, साठे वस्ती (देगाव रोड), वसंत विहार (पुना रोड), बॉम्बे पार्क, डांगे नगर, अमृत नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), राजेश कोठे नगर (लक्ष्मी पेठ), उत्तर कसबा, समर्थ सोसायटी (एसआरपी कॅम्प), भवानी पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, नेहरू नगर, प्रल्हाद नगर, निर्मिती विहार, मंत्री चंडक पार्क (विजयपूर रोड), खातिब नगर (अक्‍कलकोट रोड), मंगळवार पेठ, मुमतात नगर, मंत्री चंडक नगर, शिवाजी नगर (बाळे), लक्ष्मी नगर (संतोष नगर), उत्तर कसबा (लोहार गल्ली), साखर पेठ, गुरुनानक चौक (उजनी कॉलनी), ओम गर्जना चौक (सैफूल), दमाणी नगर, गुरुनानक नगर, दक्षिण सदर बझार, शिवाजी नगर (मोदीखाना), समता नगर (निर्मिती विहार), बुधवार पेठ, मधुबन जानकी नगर, बिलाल नगर (जुळे सोलापूर), दिपाली नगर (कुमठे), कल्याण नगर भाग क्र. एक, मंगल विहार (विष्णुपुरी), ताकमोगे वस्ती (मजरेवाडी), शंकर नगर (होटगी रोड), सुनिल नगर, निलम नगर, आदित्य नगर, मोरया हौसिंग सोसायटी (कंबर तलावाजवळ), बुधवार पेठ, उत्तर कसबा (बाळीवेस), होमकर नगर, रंगराज नगर (विडी घरकूल), गंगा नगर (जुना देगाव नाका), साठे नगर (देगाव), केदारनाथ रेसिडेन्सी (मुरारजी पेठ), देगाव, प्रगती नगर (आरटीओ कार्यालयामो), रामराज्य नगर (शेळगी) आणि डब्ल्यूआयटी कॉलेजजवळ, या ठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.