शासकीय कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना घसघशीत वेतनवाढ देण्याचा निर्णय 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 24 September 2020

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने मागील काही वर्षापासुन सुरक्षा रक्षकांना वेतन वाढ मिळावी असे प्रयत्न सुरू होते. जिल्हयातील महावितरण, विद्यापीठ, ईएसआयसी, कामगार कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, आर्युविमा महामंडळ, एफसीआय या आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा हा वेतनवाढीचा प्रश्‍न होता. मोठया कालावधी पासून हा प्रश्‍न गंभीर बनलेला होता. 

सोलापूरः जिल्हयातील विवीध शासकीय व महामंडळाच्या कार्यालयात सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मोठ्या संघर्षानंतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या निर्णयाच्या आधारे एक हजार 750 रुपयांची दरमहा वेतन व भत्तेवाढ मंजूर करण्यात आली आहे. 

हेही वाचाः यंदा दुरूनच जावई साजिरे ! कोरोनामुळे जावयांचा धोंड्याचा मानपान पडला पार गळून 

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने मागील काही वर्षापासुन सुरक्षा रक्षकांना वेतन वाढ मिळावी असे प्रयत्न सुरू होते. जिल्हयातील महावितरण, विद्यापीठ, ईएसआयसी, कामगार कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, आर्युविमा महामंडळ, एफसीआय या आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा हा वेतनवाढीचा प्रश्‍न होता. मोठया कालावधी पासून हा प्रश्‍न गंभीर बनलेला होता. 

हेही वाचाः सांगोला तालुक्‍यातील पशुवैद्यकीय विभागात 21 पदे रिक्त ! साथीच्या रोगाने पशूंचे आरोग्यच धोक्‍यात 

सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्डाकडे ही मागणी करण्यात आली. पण मागणी मान्य झाल्याने सुरक्षा रक्षक महासंघाने आंदोलने केली. आंदोलनाच्या नंतर बोर्डाने या रक्षकांच्या गणवेशाची रक्कम प्रदान केली. मात्र वेतन व भत्ते वाढीबाबत पून्हा निर्णयाची अडचण कायम होती. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना या प्रश्‍नी बेमुदत उपोषणाचा इशारा बोर्डाला दिला. या सोबत कर्मचाऱ्यांचा विमा, ईएसआय, वेतन चिट्ठी, टीडीएस कपात रद्द करणे, बेकायदेशी सुरक्षा रक्षक पुरवठादारावर कारवाई करणे आदी मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे या बाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. तसेच सुरक्षा रक्षकांना या महिन्यापासून एक हजार 750 रुपये वेतन व भत्तेवाढ मंजूर केल्याचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सुरक्षा रक्षक महासंघाचे मदन कुलकर्णी, अध्यक्ष शिवराम भोसले, शहराध्यक्ष नंदकुमार भोसले, प्रशांत राठोड, रवि चव्हाण, बांधकाम कामगार महासंघाचे अध्यक्ष अंबादास म्हेत्रे यांची उपस्थिती होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to give exorbitant pay hike to security guards in government offices