ओबीसी प्रवर्गाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा ओबीसी क्रांती मोर्चाचा निर्णय

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 7 October 2020

संघटनेची बैठक येथील हॉटेल वैष्णवीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी बैठकीत विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. सरकारने मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी. ओबीसीची राज्यस्तरीय जनगणना करण्यात यावी. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जाव्यात. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधीची तरतुद शासनाने करावी. महाज्योती या संस्थेला शंभर कोटी रुपयांची निधी ताबडतोब देण्यात यावा. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाच्या आरक्षणाचा विचार करण्यात यावा या मुद्दयावर चर्चा झाल्यानंतर पुढील काळात आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी संघटनेचे प्रमुख निमंत्रक युवराज चुंबळकर यांनी ओबीसी समाजाची जनगणना स्वतंत्र न झाल्यास पुढील काळात शासनाच्या जनगणनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. ओबीसी क्रिमीलेअरची अट रद्द करून शासनाने नोकर भरतीचा अनुशेष भरून काढावा या मागण्या मांडल्या. या मुद्दयावर पुढील काळात मोर्चा काढण्याचे ठरले. 

सोलापूरः येथील ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्याच्या संदर्भात पुढील काळात व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी विकासाच्या अनुषंगाने अनेक प्रश्‍न अद्याप सुटले नाहीत हे लक्षात घेऊन पुढील आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामीण मध्ये 11 जणांचा मृत्यू 

संघटनेची बैठक येथील हॉटेल वैष्णवीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी बैठकीत विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. सरकारने मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी. ओबीसीची राज्यस्तरीय जनगणना करण्यात यावी. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जाव्यात. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधीची तरतुद शासनाने करावी. महाज्योती या संस्थेला शंभर कोटी रुपयांची निधी ताबडतोब देण्यात यावा. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाच्या आरक्षणाचा विचार करण्यात यावा या मुद्दयावर चर्चा झाल्यानंतर पुढील काळात आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी संघटनेचे प्रमुख निमंत्रक युवराज चुंबळकर यांनी ओबीसी समाजाची जनगणना स्वतंत्र न झाल्यास पुढील काळात शासनाच्या जनगणनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. ओबीसी क्रिमीलेअरची अट रद्द करून शासनाने नोकर भरतीचा अनुशेष भरून काढावा या मागण्या मांडल्या. या मुद्दयावर पुढील काळात मोर्चा काढण्याचे ठरले. 

हेही वाचाः रस्ता खोदाईने सोलापूरवासियांचे मोडले कंबरडे 

यावेळी उत्तम भैय्या नवघरे, माजी महापौर सूभाष पाटणकर,ओबीसी नेते शंकरराव लिंगे, नाभीक समाजाचे डॉ. माधुरी पारपल्लीवार, ऍड.आर.व्ही.गुरव, मुस्लीम ओबीसी नेते इरफान, कुणबी समाजाचे नागेश शिंदे, विजया पाटील, प्रकाश पवार, नाभीक समाजाचे रविंद्र जोगीपेटकर, साळी समाजाचे निर्मला भंडारे, संतोष गद्दी आदींनी त्यांची मनोगते मांडली. बैठकीसाठी मुस्लीम ओबीसी समाजाचे एजाज शेख, ज्ञानेश्‍वर केदारलिंगे, प्रसाद कुमठेकर, बाळकृष्ण आजेगावकर यांच्यासह धनगर समाज, सोनार समाज, शिवशिंपी समाज, जैन ओबीसी यांच्यासह अनेक समाजाचे प्रतिनीधी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक ऍड. राजन दिक्षीत यांनी केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision of OBC Kranti Morcha to agitate on the question of OBC category