अल्पवयीन मुलांवर अत्याचार व हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 17 October 2020

राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करूण्यात आले. बळी पडलेल्या निष्पापांचे आई-वडिल मुळ गांवी मध्यप्रदेशातील नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. जळगांव जिल्ह्यातील रावेर पासून काही अंतरावरील बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या बागेतील एका पत्र्याच्या खोलीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लहान लहान मुली-मुले असताना कुठलीही दयामाया न दाखविता त्या नराधमांनी अत्याचार करुन त्यांची कुन्हाडीने हत्या केली आहे. लगेच जळगांव पोलीसांनी शिताफीने वरील नराधमांना अटक केली. 

सोलापूरः जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्‍यात आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन बहीण भावंडावर अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या आरोपी नराधमांना त्वरीत फाशी देण्यात यावी अशी मागणी असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने करण्यात आली. 

हेही वाचाः कोरोनामुक्त तीन डॉक्‍टरांच्या प्लाझ्मा दानाने सोलापूरात प्लाझ्मा उपचारास होणार सुरवात 

राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करूण्यात आले. बळी पडलेल्या निष्पापांचे आई-वडिल मुळ गांवी मध्यप्रदेशातील नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. जळगांव जिल्ह्यातील रावेर पासून काही अंतरावरील बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या बागेतील एका पत्र्याच्या खोलीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लहान लहान मुली-मुले असताना कुठलीही दयामाया न दाखविता त्या नराधमांनी अत्याचार करुन त्यांची कुन्हाडीने हत्या केली आहे. लगेच जळगांव पोलीसांनी शिताफीने वरील नराधमांना अटक केली. 

हेही वाचाः कोरोना बाधितांच्या संख्येने ओलांडला 38 हजारांचा टप्पा 

हे कृत्य करणारे नराधमांना कुठलीही दया न दाखविता त्वरीत फाशीची शिक्षा देण्यात यावी व तशी तरतुद देखील करण्यात यावी अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने विनंती करण्यात आली, तसेच या घटनेचा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सत्तर फुट रोड येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 
यावेळी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, व्यंकटेश गुंडला, सतीश दासरी, बालाजी बुधारम, तिमप्पा मादगुंडी, सतिश गोरंटला, दामोदर येलदी, राजेशम कल्याणम, लक्ष्मीनारायण येलदी, शंकर कनकी, महादेव दुदगी, लक्ष्मण डब्बे, पुजा भुंगेवाले, रेखा मन्सावाले, लता कंदी, ललिता कन्नम, महादेवी भिमनाथ, जयश्री पंतुवाले आदी उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for execution of perpetrators of atrocities and murders of minors