ठेकेदारीतील विडी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड व सर्व्हिस लागू करण्याची मागणी 

vidi kamgar nivedan.jpg
vidi kamgar nivedan.jpg

दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः सोलापूर शहरात अनेक ठेकेदारी विडी कारखाने असून त्यामध्ये काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड व सर्व्हिस लागू करण्याची मागणी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने करण्यात आली. 

यावेळी डॉ. गोवर्धन सुंचू, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, सतिश दासरी, अंबिका गादास, विजया आडेप, शारदा गुंडेटी, लक्ष्मीबाई नल्ला, श्रीनिवास कोडम, लक्ष्मीनारायण येलदी आदी उपस्थित होते. 

सोलापूर शहरात न्यु पाच्छा पेठ परिसर, सुनिल नगर, निलम नगर, माधव नगर, मुमताज नगर, नविन विडी घरकुल, जुना विडी घरकुल, घोंगडे वस्ती, दाजी पेठ, दत्त नगर, कुचन नगर, अशोक चौक शास्त्री नगर आदि परिसरात अनेक ठेकेदार विडी कारखाने असून ते कारखाने सरकारी कार्यालये बंद झाल्यानंतर रात्री 7.00 ते 9.00 या वेळेत चालतात. मोठ्या विडी कंपनीच्या ब्रॅन्ड प्रमाणे तसेच काही विडीचा डुप्लीकेट दोरा वापरुन मोठ्या विडी कारखान्याचेच विडी बंडल आहे, असा देखावा करुन ती विडी बाजारात विकून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. 
वास्तविक हे ठेकेदारी कारखानदार शासनाचा महसुल बुडवित आहेत. त्यांच्याकडे विडी कारखाना चालविण्यासाठी कोणताच शासन परवाना नाही. एकप्रकारे अवैध धंद्याप्रमाणे चालवून विडी कामगारांना दर हजार विड्यामागे फक्त 100/- रुपये मजूरी देऊन विडी कामगारांच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन हे लोक ठेकेदार विडी कारखाना चालवित आहेत. यामुळे परवानाधारक विडी कारखान्याच्या विडी विक्रीवर परिणाम होऊन ते कारखाने संकटात आहेत. काही कारखानदारांनी विडी कामगारांची कपात देखील केली आहे. त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी सर्व ठेकेदार विडी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करुन विडी कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रॉव्हिडंट फंड व सर्व्हिस लागू करण्याचा आदेश द्यावा तसेच ज्या ठेकेदार विडी कारखानदारांची परवानगी नाही त्या कारखान्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने देण्यात आले. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com