सीना-कोळगाव धरणात सोडा कुकडीचे पाणी; शेतकऱ्यांची मागणी

अण्णा काळे 
Friday, 14 August 2020

करमाळा तालुक्‍याच्या पूर्व भागासाठी कोळगाव धरण महत्त्वाचे आहे. कोळगाव धरणात तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आनंदित झाले आहेत. यापूर्वी धरणात तीन वर्षे उपयुक्त पाणी साठा नसल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत हवालदिल झाला होता. पाणीसाठा अत्यंत कमी होता. त्यामुळे तोही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मागील वर्षी अनेक वेळा कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे वाहून जाणारे पाणी धरणात सोडण्याची मागणी केली होती; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. 

करमाळा (सोलापूर) : तीन वर्षांनंतर सीना- कोळगाव धरणात पाणी आले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्‍याच्या पूर्व भागातील सीना-कोळगाव धरणात कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे वाहून जाणारे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा : सकाळ इम्पॅक्‍ट : धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी वर्क ऑर्डर निघाली, पावसाळ्यानंतर प्रारंभ 

तीन वर्षांनंतर सीना- कोळगाव धरणात पाणी आल्यामुळे या पाण्याचे पूजन सीना- कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, माजी सरपंच औदुंबरराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, राजेंद्र भोसले, जगन्नाथ ननवरे, ज्येष्ठ नागरिक आंबऋषी भील, माजी सदस्य गोकुळ साळुंखे, बप्पा रोकडे, कालिदास नीळ, अजिनाथ टाळके, बाबासाहेब जगताप उपस्थित होते. 

हेही वाचा : सावधान..! मोहोळ शहराजवळच दिसला बिबट्या; नागरिकांना खबरदारीचा इशारा 

या वेळी सतीश नीळ म्हणाले, करमाळा तालुक्‍याच्या पूर्व भागासाठी कोळगाव धरण महत्त्वाचे आहे. कोळगाव धरणात तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आनंदित झाले आहेत. यापूर्वी धरणात तीन वर्षे उपयुक्त पाणी साठा नसल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत हवालदिल झाला होता. पाणीसाठा अत्यंत कमी होता. त्यामुळे तोही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मागील वर्षी अनेक वेळा कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे वाहून जाणारे पाणी धरणात सोडण्याची मागणी केली होती; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या वर्षी पूर्व भागातील शेतकरी बांधवांची मागणी आहे, की सीना - कोळगाव धरण परिसरात आणखी एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरण पूर्ण भरते का नाही याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कुकडी प्रकल्पाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी सीना नदीत सोडून सीना - कोळगाव धरणात सोडावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for release of Kukadi's water in Sina-Kolgaon dam