वाढत्या रुग्णसंख्येमुळे "या' नागरिकांनी केली कोव्हिड केअर सेंटरची मागणी 

Covid care center
Covid care center

नातेपुते (सोलापूर) ः माळशिरस तालुक्‍यातील काम चांगले आहे, अशी प्रशंसा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आणि दुसऱ्याच दिवशी तालुक्‍याची कोरोना बाधितांची संख्या पाचने वाढली. एकूण तालुक्‍यात कोरोनाबाधित 11 रुग्ण असून, यासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना केअर सेंटर त्वरित सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. 

अकलूज येथे उपजिल्हा रुग्णालय असून, या ठिकाणी सध्या 50 बेडची सोय आहे. 100 बेड मंजूर आहेत. सहा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. एक अधीक्षक पद रिक्त आहे. सर्व सोयी या ठिकाणी असून उपचार केंद्र त्वरित करणे गरजेचे आहे. अकलूज रुग्णालयात दररोज 400 ओपीडी होतात. महिन्याला 100 प्रसूती होतात. त्यापैकी किमान चाळीस सिझर असतात. या सर्वांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे येथे केअर सेंटर करू नये, असा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा राजकीय नेत्यांकडे आग्रह आहे. 

अकलूजला उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी त्वरित कोरोनाचे सर्व उपचार होणे गरजेचे आहेत. ओपीडी व बाळंतपण अकलूज येथील खासगी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे पाठवावेत. कोरोना काळातील या रुग्णांची बिले संबंधित खासगी डॉक्‍टरांनी घेऊ नयेत आणि बाळंतपण मोफत करावे, असाही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांचे आहे. एकूणच कोरोना केअर सेंटर कुठे सुरू करायचे याबाबत विविध मतप्रवाह सुरू आहेत. लक्षणे नसणाऱ्यांवर महाळुंग येथे उपचार सुरू आहेत. परंतु, संशयित आणि लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे, अशांसाठी उपजिल्हा रुग्णालयात त्वरित उपचार केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com