एकत्रित लढ्यानेच कोरोनावर नियंत्रण शक्‍य : उपजिल्हाधिकारी देशमुख 

Majhe Kutumb
Majhe Kutumb

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांच्यासह लोकांनी एकत्रित लढा दिल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे केले. 

कंदलगाव येथे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाचा प्रारंभ करताना निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या विद्युल्लता कोरे, सभापती सोनाली कडते, मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, सरपंच रावसाहेब पाटील, उपसरपंच सविता वाघमारे, मंद्रूपच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे, कंदलगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा घोगरे, डॉ. संगीता नलावडे, तलाठी निंगू कोळी, ग्रामसेवक दयानंद पाटील आदी उपस्थित होते. 

श्री देशमुख पुढे म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळवताना केवळ सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यासाठी लोकांसह लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला यांना कोरोनापासून अधिक धोका असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. शासनाच्या नियमांचे पालन करीत कामाला महत्त्व द्यावे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत एक महिना प्रत्येक घराचा सर्व्हे सुरू राहणार आहे. आरोग्य पथकातर्फे ऑक्‍सिजनचे प्रमाण, ताप, खोकला, सर्दी यासह अन्य तपासण्या करण्यात येणार आहेत. वेळेवर उपचार झाल्यास कोरोनावर विजय मिळविणे शक्‍य आहे. 

या वेळी तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी कुटुंबाची अपरिमित कायमस्वरूपी हानी टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहून गर्दीचे कार्यक्रम टाळावेत तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com