कोरोनाला न जुमानता "येथे' आले कोसो दूरहून मेंढरांचे कळप 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

उन्हाची व पावसाची पर्वा न करता, कोरोना विषाणूला न जुमानता कोल्हापूर येथील गुंडा कोळेकर आणि स्वप्नील कोळेकर हे दोन बंधू कोसो दूरवरून नाझरे मठ परिसरात पायी चालत आले असून, कुठेही कुणाच्याही रानात रात्री मुक्काम ठोकायचा आणि सकाळ होताच दिवसभर माळरानात मेंढरं हिंडवायची आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरून मेंढरांनाही जागवायचं, असा यांचा रोजचा दिनक्रम चालू आहे. 

नाझरा (सोलापूर) : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील नाझरे मठ परिसरात कोल्हापूर येथील मेंढरांचे कळप पोटाची खळगी भरण्यासाठी आले आहेत. मेंढपाळ मेंढरं जगविण्यासाठी दाखल झाले असून, गेला आठवडाभर गावात व परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र हिरवेगार गवत उगवले आहे. 

हेही वाचा : बार्शी तालुक्‍यात 92 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी 

उन्हाची व पावसाची पर्वा न करता, कोरोना विषाणूला न जुमानता कोल्हापूर येथील गुंडा कोळेकर आणि स्वप्नील कोळेकर हे दोन बंधू कोसो दूरवरून पायी चालत आले असून, कुठेही कुणाच्याही रानात रात्री मुक्काम ठोकायचा आणि सकाळ होताच दिवसभर माळरानात मेंढरं हिंडवायची आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरून मेंढरांनाही जागवायचं, नाझरे येथील माण नदीवरील बंधाऱ्याच्या साचलेल्या पाण्यात मेंढरांना पाणी पाजायचं, उन्हाच्या तीव्रतेपासून वाचविण्यासाठी झाडाचा आडोसा घ्यायचा असा यांचा रोजचा दिनक्रम चालू आहे. 

हेही वाचा : कोरोनासोबत एकटा नव्हे तर कुटुंबीयांसह लढतोय डॉक्‍टर! 

नाझरे आणि परिसरात मेंढरांचे कळप प्रत्येक वर्षी येतात. आषाढ महिन्यात साऱ्या माळरानावर मेंढरांचे कळपच्या कळप दिसतात. हे दोघे बंधू मेंढरांची अगदी पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. दिवसेंदिवस या मुक्‍या जनावरांना खायला काहीच नसल्यामुळे या मुक्‍या जनावरांना वाचवण्यासाठी मेंढपाळांची धावपळ सुरू झाली असून, त्यांच्यापुढे पाण्याचा आणि मेंढरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. ज्यांच्यावर आपला रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांना या या दिवसांत कसं जगावायचं याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. इतक्‍या चाळीस-पन्नास मेंढ्या आणि शेळ्या कशा जगवायच्या, या विवंचनेत हे मेंढपाळ सैरभैर झालेले दिसत आहेत. दिवसभर चाऱ्याच्या शोधात मेंढ्यांमागे मागे भटकत फिरायचं, धोतराच्या धडप्यातला भाकरीचा तुकडा खाऊन कशीबशी पोटाची खळगी भरायची आणि पुन्हा वाळल्या कुसळात साऱ्या माळांनी मेंढारांमागं धावायचं... हे सारं त्यांना मेंढरं जगविण्यासाठी करावं लागत आहे. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करावं लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the corona a herd of sheep came from Kolhapur to Najhare Math