कोरोनाच्या रुग्णांना "या' दिल्या जातात सुविधा

This diet is given to corona patients
This diet is given to corona patients
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरसने सध्या धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी वेळोवेळी सूचना देत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भिती आहे. त्यातून अनेकांना कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात काय सुविधा दिल्या जातात असा प्रश्‍नही पडला असेल ना? 

हेही वाचा : सोलापुरातील 214 जणांचा कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित
कोरोनाचा प्रदुर्भव वाढू नये म्हणून ज्या भागात रुग्ण सापडला आहे. तेथील भाग सील केला जातो. सोलापूरात रविवारी (12 एप्रिलला) पहिला रुग्ण कोरोना बाधीत आढळला. मृत्यूनंतर त्याचे स्वब तपासण्यात आले होते. त्यानंतर तेथील संपूर्ण परिसर सील केला. त्यानंतर आणखी एका रुग्णाची भर पडली. पुढे हा आकडा वाढत गेला. सध्या सोलापुरात 13 कोरोनाचे रुग्ण आहेत. या रुग्णांना बरे करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात डॉक्‍टरांची टीम कार्यतर आहे. यामध्ये आठ वर्षाचे एक बाळही आहे. रुग्णाने घाबरुन न जाते त्या मनोधैर्य वाढावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यांना घरातल्यासारखे वातावरण वाटावे म्हणून टीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यांना तिथे सकस आहारही दिला जातो. त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाइकाला जेवणही दिले जात आहे. याबरोबर त्यांना गरम पाणी थर्मासची ऑर्डर केली जात आहोत. रुग्णाला आपण घरी राहत आहोत असे वाटावे, अशा सुविधा तेथे दिली जात असल्याचे सर्वोपच्चार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. 

हेही वाचा : धक्कादायक! सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांचा असा आहे वयोगट
सोलापुरात रविवारी म्हणजे 12 एप्रिलला कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यानंतर तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. तो रुग्ण 56 वर्षांचा होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाने घेतला. त्यात 12 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. यामध्ये आठ वर्षांचे एक बाळ आहे. तर शेवटच्या रुग्णाचे वय 61 वर्षे आहे. त्यांची दिवसातून पॅरामीटरने सात ते आठ वेळा तपासणी केली जाते. त्यांना बरे करून दोन आठवड्यांत घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com