राज्यातील जिल्हास्तरीय हज समित्या रद्द

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 25 मार्च 2020

ही समिती स्थापन झाल्यावर तीचा कालावधी तीन वर्षे निश्चित करण्यात आला होता. तीन वर्षे झाली की समिती आपोआप रद्द होईल, असे नियोजन होते.

सोलापूर - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय हज समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला आहे. अल्पसंख्याक विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. 

महाराष्ट्र हज समितीला जिल्ह्यातील प्रत्येक हज यात्रेकरुंशी संवाद साधता यावा या हेतुने जिल्हास्तरीय हज समिती स्थापन करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला होता. या समितीला जिल्हास्तरीय हज समिती असा स्वतंत्र दर्जा होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांसह एकूण 11 सदस्यांची या समितीत नियुक्ती केली जात होती. 

ही समिती स्थापन झाल्यावर तीचा कालावधी तीन वर्षे निश्चित करण्यात आला होता. तीन वर्षे झाली की समिती आपोआप रद्द होईल, असे नियोजन होते. मात्र आता शासनानेच समिती गठीत करण्याचा निर्णय रद्द केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disrict haj comitee dismissed by state government