esakal | सोलापूर ते पुणे- मुंबई अंतर होणार कमी ! रेल्वेचे दुहेरीकरण- विद्युतीकरण अंतिम टप्प्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

0indian_railway66666_0 - Copy.jpg

दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतरचे अपेक्षित बदल...

 • पुणे- सिकंदराबादचे रुपांतर 'वंदे-भारत एक्‍सप्रेस'मध्ये केल्यास प्रवाशांना वेगवान प्रवास करता येईल
 • 'शताब्दी एक्‍सप्रेस'च्या जागेवर पुणे-सिकंदराबाद चालविल्यास प्रवासाचे अंतर 8 तासांवरुन 6 तासांवर येईल
 • 'गतिमान-एक्‍सप्रेस' 160 किलोमीटर प्रतितास केल्यास ती 'तुफान एक्‍सप्रेस' तथा सेमी बुलैट ट्रेन होऊ शकते
 • गतिमान एक्‍स्प्रेस ही वेगवान गाडी हुतात्मा सुपरफास्ट एक्‍सप्रेसच्या जागी भविष्यात चालवली जाऊ शकते
 • सोलापूर- पुणे प्रवासी अंतर 4 तासांऐवजी भविष्यात दोन ते अडीच तास होईल
 • कोल्हापूर- सोलापूर एक्‍स्प्रेस पहाटे पाच वाजता सोलापुरात येते, रात्री साडेअकरा वाजता कोल्हापुरला रवाना होते. तत्पूर्वी, ही गाडी हैदराबादपर्यंत विस्तारीत होऊ शकते 

सोलापूर ते पुणे- मुंबई अंतर होणार कमी ! रेल्वेचे दुहेरीकरण- विद्युतीकरण अंतिम टप्प्यात 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : बिग-वन ते कलबुर्गीपर्यंत विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर गाड्यांच्या वेग वाढणार असून सोलापूर- पुणे, सोलापूर- मुंबईसह अन्य मार्गांवरील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मेल, एक्‍स्प्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी व अतिजलद गाड्यांच्या संख्येतही वाढ होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोलापूर विभाग हा मोठा टर्मिनस होण्यास मदत होणार आहे.

भविष्यात 160 ते 180 किलोमीटरचे अंतर प्रतितास वेगाने धावणार आहे. दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्या क्रॉसिंगला थांबणार नसल्याने चोरी, दरोड्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. लोकप्रतिनिधींनी रेटा लावल्यास सोलापूर विभाग हे आगामी काळात दक्षिण भारतातील बेंगलोर, म्हैसूर, तिरुअंनतपुरम, चेन्नई, तिरुपती आणि कन्याकुमारी या ठिकाणांना जोडणारे मोठे टर्मिनस होऊ शकते. त्यातून मोठा महसूल जमा होईल. दुसरीकडे सोलापूरहून गुजरात, राजस्थान या विभागातील सोलापूर- जयपूर, सोलापूर- अहमदाबाद, सोलापूर- वैष्णवदेवी, सोलापूर- वाराणसी व सोलापूर- नागपूर या गाड्या सोलापुरातून सुटण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे सोलापूर व माढ्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.

गाड्यांचा वेग निश्‍चितपणे वाढेल 
विद्युतीकरण आणि दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग निश्‍चितपणे वाढणार आहे. प्रवाशांना कमी वेळेत जास्त अंतराचा प्रवास करणे शक्‍य होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर विभागात कोणत्या गाड्या वाढतील, हे निश्‍चित होईल. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे

दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतरचे अपेक्षित बदल...

 • पुणे- सिकंदराबादचे रुपांतर 'वंदे-भारत एक्‍सप्रेस'मध्ये केल्यास प्रवाशांना वेगवान प्रवास करता येईल
 • 'शताब्दी एक्‍सप्रेस'च्या जागेवर पुणे-सिकंदराबाद चालविल्यास प्रवासाचे अंतर 8 तासांवरुन 6 तासांवर येईल
 • 'गतिमान-एक्‍सप्रेस' 160 किलोमीटर प्रतितास केल्यास ती 'तुफान एक्‍सप्रेस' तथा सेमी बुलैट ट्रेन होऊ शकते
 • गतिमान एक्‍स्प्रेस ही वेगवान गाडी हुतात्मा सुपरफास्ट एक्‍सप्रेसच्या जागी भविष्यात चालवली जाऊ शकते
 • सोलापूर- पुणे प्रवासी अंतर 4 तासांऐवजी भविष्यात दोन ते अडीच तास होईल
 • कोल्हापूर- सोलापूर एक्‍स्प्रेस पहाटे पाच वाजता सोलापुरात येते, रात्री साडेअकरा वाजता कोल्हापुरला रवाना होते. तत्पूर्वी, ही गाडी हैदराबादपर्यंत विस्तारीत होऊ शकते 
 • भविष्यात दिल्ली, जयपूर, हावडा, अजमेर, गोरखपूर, पटना, अमृतसर, वाराणसी, नागपूर, भुसावळ, गोवा, हैद्राबाद, कानपूर, गोंदिया, तिरूपती, हुबळी, अकोला या ठिकाणांसाठी स्वतंत्र गाड्या सोलापुरातून सुटू शकतात
 • मुंबई- बेंगलोर- चेन्नई आणि मुंबई- हैद्राबाद- भुवनेश्‍वर प्रमुख दोन लोहमार्गावर तसेच दौंड- मनमाड- भुसावळ- नागपूर उत्तर-पूर्व दिशांच्या मार्गांवरील लांब पल्ल्यांच्या नवीन गाड्या राजधानी, संपर्क क्रांती, दुरांतो, हमसफर, अंत्योदय, सुविधा स्पेशल, जनशताब्दी, तेजस आणि सुपरफास्ट एक्‍सप्रेस अशा गाड्या वाढू शकतात
 • जलद व आरामदायी प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतुकीचे प्रमाणही वाढ होऊ शकते
 • भविष्यात होटगी रेल्वे स्टेशन येथे विद्युत लोको इंजिन शेड होण्यास मोठी मदत होईल