शेतकऱ्यांनो, खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांची द्या त्वरित माहिती : जिल्हा कृषी विभागाकडून आवाहन 

दयानंद कुंभार 
Tuesday, 29 September 2020

गेल्या काही दिवसांत सततच्या संततधार पावसामुळे खरीप हंगामात उडीद, सोयाबीन, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा कृषी विभागाने एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे, की शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती त्वरित द्यावी. 

वडाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसांत सततच्या संततधार पावसामुळे खरीप हंगामात उडीद, सोयाबीन, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा कृषी विभागाने एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे, की शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती त्वरित द्यावी. 

कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले, की ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2020 पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडे कळवावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी Crop insurance ऍपद्वारे तसेच Customer.service@ bhartiaxa.com या ई-मेल वरही माहिती कळवावी. ऍपद्वारे माहिती कळविल्यानंतर कृषी विभागाचे आधिकारी, कर्मचारी व विमा प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करतील. ज्या पिकांचा खरीप हंगाम 2020 मध्ये पीक विमा भरला आहे, अशा पिकांच्या नुकसानीची माहिती ऑनलाइन सादर करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केले आहे. 

तसेच शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तालुकानिहाय विमा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक दिले आहेत, ते पुढीलप्रमाणे 
अक्कलकोट : दशरथ श्रीमंत यळसंगे 8788268798, दक्षिण सोलापूर : अजित इंद्रजित सावंतराव 9175020091, उत्तर सोलापूर : नागेश किशोर भरडे 8788798766, 
मोहोळ : संदीप एकनाथ किपनर 9511935999, पंढरपूर : विष्णू बाळासाहेब गायकवाड 9146868127, मंगळवेढा : बसवराज शांताराम सुतार 860554177, सांगोला : चेतन चंद्रकांत खटकाळे 9665698566, माळशिरस : उमेश सुनील पळसे 7083697172, बार्शी : किशोर गणपत वळसे 9960997899, माढा : आकाश अंकुश नवसारे 9665283814, करमाळा : अक्षयकुमार रघुनाथ रेगुडे 8459601881 या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The district agriculture department appealed to the farmers to provide information about the damaged crops during the kharif season