कोरोनाच्या आव्हानावर मात करत येत आहेत दिवाळी अंक : सुनील शिनखेडे 

padmakar Kulkarni.jpeg
padmakar Kulkarni.jpeg

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशावरच नव्हे संपूर्ण जगावर मोठे संकट आले असताना सर्व क्षेत्रांना याची झळ सहन करावी लागली आहे. तशी प्रकाशन व्यवसायाला या कोरोनाची झळ बसली आहे. या कोरोनाच्या आव्हानावर मात करत विविध दिवाळी अंक सध्या प्रकाशित होत आहेत. मात्र, यात साहित्य "चपराक'चा दिवाळी अंक हा अग्रणी ठरला आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरच्या वतीने शिनखेडे यांच्या हस्ते साहित्य "चपराक'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. साहित्य पारिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मसापच्या कार्याध्यक्षा सायली जोशी आय.एम.एसचे संचालक अमोल जोशी,आणि पत्रकार सागर सुरवसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती. 

शिनखेडे पुढे म्हणाले की, साहित्य चपराकचा दिवाळी अंक हा इतर अंकाच्या तुलनेत वेगळा आणि उजवा आहे. त्यातील मजकूर आणि त्याचा आशय अतिशय उत्तम आहे. अनेक लेखकांचे साहित्य या अंकात वाचायला मिळते. महाराष्ट्रात कथा हा लेखन प्रकार कमी होत असतानाच चपराकने मात्र ग्रामीण भागातील अनेक कसदार लेखकांना लिहिते केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वेगळं विश्व कथांच्या माध्यमातून अंकात प्रतिबिंबित झालं आहे. त्याचबरोबर जवळपास शंभरहून अधिक कवींच्या कविता अंकात प्रकाशित केल्या आहेत. मला वाटते इतके लेखक कोणत्याही दिवाळी अंकात नसावेत असे मला वाटते. चपराकचे संपादक घनश्‍याम पाटील हे अतिशय द्रष्टे असून नियोजनबद्ध आखणी आणि कष्ट यामुळे हा अंक वाचनीय आणि संग्राह्य झाला आहे. 

"चपराक', दिवाळी अंक हा एकाचवेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी ठरला आहे. दर्जेदार अंकाची निर्मिती, त्याचे वितरण आणि राज्यभर जवळपास शंभरहून अधिक ठिकाणी त्याचे प्रकाशन झाले आहे. विशेष म्हणजे राज्यासह मध्यप्रदेश तसेच अमेरिका,कॅनडातही चपराक दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात चपराकने घेतलेली झेप निश्‍चितच उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केले. 

यावेळी मसापचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्यवाह संदीप कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, रामचंद्र धर्मसाले, कवी गोविंद काळे, कवी मारूती कटकधोंड आदी लेखक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सागर सुरवसे यांनी केले तर प्रमुख कार्यवाह गिरीष दुनाखे यांनी आभार मानले. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com