मास्क हनुवटीवर ठेवू नका ! शहरात आज आढळले 19 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Tuesday, 1 December 2020

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 22 हजार 375 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • एकूण टेस्टमध्ये आतापर्यंत आढळले दहा हजार 406 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • जुनी लक्ष्मी चाळ (डोणगाव रोड) येथील 64 वर्षीय पुरुषाचा झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • शहरातील मृतांची संख्या झाली 562; आता शहरात उरले 436 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील नऊ हजार 408 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : शहरात आज 705 संशयितांमध्ये 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आठ पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, मास्क काढून जेवायचे असल्यास अथवा पाणी प्यायचे असल्यास मास्क काढताना पूर्णपणे काढून ठेवा. मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 22 हजार 375 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • एकूण टेस्टमध्ये आतापर्यंत आढळले दहा हजार 406 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • जुनी लक्ष्मी चाळ (डोणगाव रोड) येथील 64 वर्षीय पुरुषाचा झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • शहरातील मृतांची संख्या झाली 562; आता शहरात उरले 436 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील नऊ हजार 408 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

शहरात आज डोणगाव रोड (सोरेगाव), सोहम प्लाझा (सैफूल), मुरारजी पेठ, महिला हॉस्पिटजवळ (होटगी रोड), रेल्वे लाईन्स, कन्नी नगर (दहिटणे), पश्‍चिम मंगळवार पेठ, चैतन्य नगर (विजयपूर रोड), उत्तर सदर बझार, विद्या नगर (पाथरूट चौक), कोणार्क नगर (जुळे सोलापूर), बुधवार पेठ, बेगम पेठ, उमा सोसायटी (जुनी मिल कंपाउंड), वसंत विहार आणि धोंडीबा वस्ती येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, 27 नोव्हेंबरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 64 वर्षीय पुरुषाचा 29 नोव्हेंबरला मृत्यू झाला असून त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णांच्या संपर्कातील 109 संशयित होम क्‍वारंटाईन असून 68 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 43 जण होम आयसोलेशेनमध्ये ठेवण्यात आले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not put the mask on the chin! 19 positives found in the city today