अर्रार्र! लॉकडाउनमुळे शेतात राहण्यास गेलेल्या घरातून चोरट्याने दागिने लांबविले

crime news
crime news
Updated on

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे शांती नगरजवळील मित्र नगरातील संतोष विठ्ठल चव्हाण हे कुटुंबासमवेत तोळणूर येथे शेतात राहण्यास गेले. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे 74 हजार 800 रुपयांचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

लॉकडाउननंतर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्याने संतोष चव्हाण हे अद्यापही तोळणूर येथील शेतात राहतात. त्यांचा लहान भाऊ गावी जाणार असल्याने 7 व 8 जूनला घरी राहण्यास आला होता. त्यानंतर घर लावून तो गावी निघून गेला. दरम्यान, 24 जून रोजी शेजारील व्यक्‍तीने फोन करुन चव्हाण यांना घराचे कुलूप चोरट्याने तोडल्याचे सांगितले. घरी येऊन पाहिले असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने गायब झाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि चोरीची फिर्याद दिली. 


रिक्षातून प्रवास करताना महिलेचा मोबाइल लंपास 
सोलापूर : मड्डी वस्ती येथील थांब्यावरुन रिक्षात बसलेल्या रेणुका लिंगप्पा यदलापुरे (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांचा प्रवासादरम्यान शेजारील महिलांनी मोबाइल लंपास केला. या प्रकरणी रेणुका यदलापुरे यांनी दोन अनोळखी महिलांविरुध्द जोडभावी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मड्डी वस्ती ते मंत्री चंडकदरम्यान ही घटना घडल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


दोघांनी दुचाकीला बांधून नेली 40 हजारांची गाय 
सोलापूर : विजयपूर रोडवरील आसरा पुलाजवळ राहणाऱ्या संतोष मधुकर भोसले यांच्या घरासमोरील 40 हजार रुपये किंमतीची गाय चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (ता. 25) घडली. समीर कुरेशी व रिहान कुरेशी यांनी दुचाकीला बांधून गाय नेल्याचे फिर्यादी संतोष भोसले यांच्या मित्राच्या पत्नीने सांगितले. त्यानुसार भोसले यांनी त्या दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. 


शहर पोलिसांची 607 वाहनचालकांवर कारवाई 
सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहरात येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नाकाबंदी लावली आहे. तर शहरात विनाकारण दुचाकी तथा अन्य वाहनांतून फिरणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी रात्री सकाळी आठ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी नाकाबंदीवेळी 377 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 615 व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईनचे आदेश देऊन त्यापैकी काहींना वैद्यकीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे शहरातील 430 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत 16 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com