विठ्ठलराव शिंदेची निवडणूक बिनविरोध; औपचारिकता बाकी, 21 जागांसाठी 21 अर्ज वैध

Election of Vitthalrao Shinde Co operative Sugar Factory has been held without any objection
Election of Vitthalrao Shinde Co operative Sugar Factory has been held without any objection

टेंभुर्णी (सोलापूर) : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. सोमवारी नामनिर्देशन पत्राच्या छानणीमध्ये 21 जागांसाठी 21 अर्जच वैध राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता बाकी असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा 2002 चे तरतूदीनुसार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची सन 2020-21 ते2025-26 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी 1 फेब्रुवारी पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. संचालक मंडळामध्ये ऊस उत्पादक सभासदांमधून 15, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती एक, महिला एक, सहकारी संस्था एक, भटक्‍या जमाती एक, इतर मागासवर्गीय एक, आर्थिक मागास वर्ग एक या 21 जागांसाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले होते. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची मुदत होती. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छानणी 15 फेब्रुवारी रोजी झाली. यामध्ये 21 जागांसाठी 21 अर्जच वैध ठरले. त्यामुळे संचालक मंडळाच्या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे हे बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करणार आहेत. 

नूतन संचालक मंडळ 

आमदार बबनराव शिंदे (निमगांव टें), रमेश येवले-पाटील (टेंभुर्णी), वामनराव उबाळे (म्हैसगाव), सुरेश बागल (बारलोणी), पोपट गायकवाड (रिधोरे), अमोल चव्हाण (उंदरगांव), निळकंठ पाटील (मानेगांव), शिवाजी डोके (कन्हेरगाव), लक्ष्मण खुपसे (उपळवाटे), विष्णू हुंबे (बेंबळे), प्रभाकर कुटे (टेंभुर्णी), भाऊराव तरंगे (पापनस), रणजितसिंह शिंदे (निमगांव टें), लाला मोरे (नगोर्ली), वेताळ जाधव (रांझणी), सचिन देशमुख (आलेगांव), विक्रमसिंह शिंदे (निमगांव टें), पांडुरंग घाडगे (टाकळी टें), पोपट चव्हाण (घोटी), सिंधूताई नागटिळक (कुंभेज), संदीप पाटील (बुद्रुकवाडी). 

साखर कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सभासद शेतकऱ्यांचे बहुमोल सहकार्य असून सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास ठेऊन निवडणूक बिनविरोध केलेली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, रासप, शेकाप, सर्व शेतकरी संघटना, मनसे व इतर पक्षांनी बहुमोल सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे 
- बबनराव शिंदे, आमदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com