esakal | अकरा महिन्यांनंतर हुतात्मा एक्‍स्प्रेस रुळावर ! पहिल्या दिवशी सोलापूरहून 752 प्रवाशांचा पुणे प्रवास

बोलून बातमी शोधा

Hutatma Express}

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून तब्बल अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (1 मार्च) 6.30 वाजता हुतात्मा एक्‍स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे निघाली. पहिल्या दिवशी 752 प्रवाशांनी आरक्षित तिकिटांवर प्रवास केला असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. 

अकरा महिन्यांनंतर हुतात्मा एक्‍स्प्रेस रुळावर ! पहिल्या दिवशी सोलापूरहून 752 प्रवाशांचा पुणे प्रवास
sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून तब्बल अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (1 मार्च) 6.30 वाजता हुतात्मा एक्‍स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे निघाली. पहिल्या दिवशी 752 प्रवाशांनी आरक्षित तिकिटांवर प्रवास केला असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. 

रेल्वे बोर्डाने उशिरा का होईना सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा विशेष एक्‍स्प्रेस सुरू करून रेल्वेतील प्रवाशांना दिलासा दिला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरून आतापर्यंत सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस, गदग एक्‍स्प्रेस, भुवनेश्वर कोणार्क एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍स्प्रेस सुरू आहेत. मात्र यामध्ये सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा विशेष एक्‍स्प्रेस सुरू होताच सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. प्रवासी व त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातलगांची देखील गर्दी वाढली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा बल व प्रशासन काळजी घेत आहे. 

सोलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी सहा वाजल्यापासूनच प्लॅटफार्म क्रमांक एकवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. मात्र रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रवाशांची मास्कची तपासणी करण्यात येताना दिसून येत नव्हती. आरक्षण तिकीट असल्याची खातरजमा केल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येत होते. रेल्वे गाडी पूर्णतः सॅनिटायझ करण्यात आली होती. 

सोलापूर - पुणे - सोलापूर विशेष एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही गाडी कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. आता ही रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाली असून, प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. यामध्ये येत्या काळात आणखीन वाढ होईल. 
- प्रदीप हिरडे, 
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल