"उजनी' तुडुंब भरूनही मासे सापडण्याचे प्रमाण कमी ! दरही झाले कमी 

राजाराम माने 
Monday, 7 September 2020

केत्तूरचे मच्छीमार दत्तात्रय डिरे म्हणाले, उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असले तरी त्यामानाने मासे सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच दरही कमी झाल्याने मच्छीमारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 

केत्तूर (सोलापूर) : गणेशोत्सवानंतरच्या मोठ्या ब्रेकनंतर चिकन, मासे, मटण, अंडी या मांसाहाराला मागणी वाढली आहे. उजनी जलाशय काठोकाठ भरले असले तरी, जलाशयामध्ये मच्छीमारी करताना मच्छीमारांना जलाशयामध्ये मासे सापडण्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याने मासे मात्र कमी प्रमाणात सापडत आहेत. त्यातच माशांचे दर मात्र म्हणावे तसे वाढले नसल्याचे केत्तूर (ता. करमाळा) येथील मच्छीमारांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : बारावीत इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क, पण आता इंग्रजीमध्येच डॉक्‍टरेट ! शिरनादंगीतील युवकाचा प्रेरणादायी प्रवास 

भिगवण (ता. इंदापूर) येथील मच्छी मार्केटमध्ये उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणावर सापडला जाणारा चिलापी जातीचा मासाही सध्या कमी प्रमाणात सापडत आहे. 

सध्याचे माशांचे दर (प्रतिकिलो) 

 • लहान चिलापी : 30 ते 35 रुपये 
 • मध्यम चिलापी : 50 ते 60 रुपये 
 • मोठी चिलापी : 80 ते 100 रुपये 
 • लहान वाम : 225 ते 250 रुपये 
 • मोठी वाम : 350 ते 400 रुपये 
 • राहू : 90 ते 100 रुपये 
 • कटला : 100 ते 150 रुपये 
 • मरळ : 300 ते 320 रुपये 
 • शिवडा : 120 ते 150 रुपये 
 • गुगळी : 330 ते 350 रुपये 
 • खेकडा : 70 ते 90 रुपये 
 • झिंगा : 80 ते 100 रुपये 
 • कोळंबी : 300 ते 320 रुपये 
 • आंबळी (भाती) : 60 ते 80 रुपये 

तर चिकन 180 ते 200 तर बोकडाचे मटण 480 ते 500 रुपये किलो व इंग्लिश अंडी 300 रुपये शेकडा असे आहेत. 

हेही वाचा : "उजनी'तून भीमा नदीत 15 हजार क्‍युसेक विसर्ग; धरण परिसरात एकाच रात्रीत 100 मिलिमीटर पाऊस 

केत्तूरचे मच्छीमार दत्तात्रय डिरे म्हणाले, उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असले तरी त्यामानाने मासे सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच दरही कमी झाल्याने मच्छीमारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though the Ujani dam is full there are few fish