अखेर "त्या" कॅन्सरग्रस्त अपंगास मिळाला कुबड्यांचा आधार 

शाम जोशी
Friday, 4 December 2020

येथील महादेव नाईकवाडे शेतीत मजुरीने काम करुन संसाराचा गाडा हाकतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डाव्या पायाला एक छोटी गाठ झाली. त्यावर पैशाच्या अभावी त्यांना उपचार करता आले नाहीत. त्यामुळे त्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले. तोपर्यंत पायाच्या गाठीने चांगलेच बस्तान मांडले. तो आजार वाढत जावून त्या गाठीचा महादेव यांना खुपच त्रास होऊ लागला. 

द.सोलापूर (सोलापूर) ः हत्तुर (ता.दक्षिण सोलापूर) येथील एका शेतमजुरास कॅन्सरसह आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी अखेर जय हिंद फूड बॅंकेच्या सहाय्यातून कुबड्यांचा आधार मिळाला. 

हेही वाचाः पत्नीच्या निधनानंतरही कामगारांना तिन्ही मुलांना बनवले इंजिनीअर 

येथील महादेव नाईकवाडे शेतीत मजुरीने काम करुन संसाराचा गाडा हाकतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डाव्या पायाला एक छोटी गाठ झाली. त्यावर पैशाच्या अभावी त्यांना उपचार करता आले नाहीत. त्यामुळे त्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले. तोपर्यंत पायाच्या गाठीने चांगलेच बस्तान मांडले. तो आजार वाढत जावून त्या गाठीचा महादेव यांना खुपच त्रास होऊ लागला. 

हेही वाचाः आमदार संजयमामा शिंदे ठरले महाविकासच्या एकीकरणाचा आश्‍वासक चेहरा 

तपासणीअंती महादेव यांना कॅन्सर झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी नोंदवले. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पाय कापण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्यानुसार पाय कापला गेला. 
परंतू जगण्याची लढाई सुरुच होती. कॅंन्सर आजारापेक्षा आज ही भुक मोठीच असल्याने महादेव यांनी स्वतःचे व कुटूंबाचे पोट भरणे प्राथमिक कर्तव्य समजुन अपंगावर मात करण्यासाठी धडपड सुरु ठेवली. उपचार न घेऊ शकलेल्या महादेवने पाय नसले तरी आज जगण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली. त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांना आपंगावर मात करण्यासाठी अखेर आधार मिळाला. सोलापूरच्या अन्नपुर्णा फाउंडेशन संचलित जयहिंद फुडबॅंकेच्या माध्यमातुन महादेव यांना एक जोड कुबड्या उपलब्ध करून देण्यात आल्या.अपंग दिनाचे औचित्य साधून या कुबड्या महादेव यांना प्रदान करण्यात आल्या.यावेळी जयहिंद फुडबॅंकेचे सतिश सुरेश तमशेट्टी,अलोक तंबाके, सुधिर तमशेट्टी,ग्रामस्थ प्रशांत सलगरे, महेश तडवळकर हे उपस्थित होते. 

मदतीचे समाधान 
माणूसकी जपण्यासाठी जयहिंद फुडबॅंकेचा नेहमीच पुढाकार व प्रयत्न असतो. हत्तूर येथील महादेव नाईकवाडे यांना जगण्यासाठी आधार देता आला याचे समाधान आहे. जयहिंदचे हे मदतकार्य असेच चालू राहिल असे संस्थेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eventually, "that" crippled cripple got crutches