#UnionBudget2020 'आयटी'तील संशोधनासाठी ठोस मदतीची अपेक्षा 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 27 January 2020

संशोधनासाठी निधी द्या 
कृत्रिम बुध्दीमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा सायन्स्‌ या क्षेत्रात मुलांना रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. आयटी क्षेत्रात कोणत्याही शाखेतील अभियत्यांना उद्योग व रोजगाराची संधी वाढली आहे. आयटी क्षेत्रात म्हणावे तितके प्रगत संशोधन होऊ शकते, त्यासाठी शासन स्तरावरुन ठोस निधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा आहे. 
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर 

सोलापूर : माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगार अन्‌ उद्योगाची मोठी संधी आहे. स्वॉप्टवेअर निर्मितीत संशोधन मोठ्या प्रमाणावर होत असून देशोपयोगी संशोधनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष तरतूद करण्याची गरज आहे. जेणेकरुन देशाची वाटचाल विकसीततेकडे सुरु असून माहिती व तंत्रज्ञानातील संशोधनाचा त्याची नक्‍कीच मदत मिळेल, असा विश्‍वास 'आयटी' तज्ज्ञांनी व्यक्‍त केला. 

हेही वाचा - शेतकऱ्यांना कशासाठी हवा दिवसा वीजपुरवठा 

संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे 
स्वॉप्टवेअर कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाची मोठी संधी आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी सरकार स्तरावरुन प्रोत्साहन मिळावे. सोलापुरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी आयटी उद्योग उभारण्यासाठी शासनाने मोठी तरतूद करावी. 
- डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य, ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर 

कौशल्य निर्मिती केंद्र सुरू करा 
आगामी अर्थसंकल्पात आयटी क्षेत्रात स्वॉप्टवेअर निर्मितीचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी कौशल्य निर्मितीचे केंद्र सुरु करण्याची गरज आहे. पारंपारिक शिक्षणाला बगल देऊन आयटीच्या अभ्यासक्रम बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. सोलापुरात विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालये खूप असून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, संशोधकांना उद्योग सुरु करण्यासाठी बजेटमध्ये ठोस तरतूद करायला हवी. 
- अशोक मुलीमनी, आयटी तज्ज्ञ, सोलापूर 

हेही वाचा - शक्तीमानबाबतचे हे गुपित तुम्हाला माहितेय का 

आयटीसाठी जागा राखीव ठेवावी 
पुण्यातील आयटी पार्कच्या धर्तीवर सोलापुरात आयटी हब निर्माण होण्यासाठी जागा राखीव ठेवावी. आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी, अनेक उद्योजक निर्मितीसाठी शासन स्तरावरुन जागा उपलब्ध करुन द्यायला हवी. परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आयटी उद्योजक सोलापुरात यावेत याकरिता विमानसेवा सुरळीत करण्याची फार गरज आहे. 
- महेश चिंचोली, आयटी तज्ज्ञ, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expect solid support for information technology research