शेतकऱ्यांना "कशासाठी' हवा दिवसा वीजपुरवठा

शेतकऱ्यांना "कशासाठी' हवा दिवसा वीजपुरवठा
Updated on

सोलापूर ः राज्यातील शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे तिच्या पुरवठ्यामध्ये सातत्य राहिलेले नाही. त्यासाठी महावितरणला वीजपुरवठ्याचे योग्य ते नियोजन करावे लागत आहे. हे नियोजन करताना शेतीसाठी रात्रीही वीजपुरवठा करण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे. शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनले आहे. मात्र, ती पद्धत बंद करण्याबाबत महावितरण चकार शब्द काढत नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात त्याबाबत काहीतरी तरतूद करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दिवसा वीजपुरवठा केल्यास शेतकऱ्यांचा जीव नक्कीच भांड्यांत पडेल. 

दिवस वीज दिल्याने त्रास वाचेल 
शेतीसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. प्रत्येक आठवड्याला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जाते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाही त्यामध्ये बदल केला जातो. दिवसा वीजपुरवठा होत असताना शेतकऱ्यांना फारसा त्रास होत नाही. मात्र, रात्री दहा, बारा वाजता जर वीजपुरवठा सुरू झाला तर शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करावे लागते. ते शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. रात्री वीजपुरवठ्याची पद्धत बंद करून दिवसा वीजपुरवठा व्हावा ही अपेक्षा. 
वसिष्ठ शिंदे, शेतकरी. 

वीजदरवाढ व्हायला नको 
घरगुती वीज महाग झाल्याच्या बातम्या येत आहेत. खरेतर वीज महाग करणे हे ग्राहकांना परवडणारे नाही. त्यामुळे घरगुती वापरासाठीच्या विजेच्या दरामध्ये वाढ करू नये. महावितरणला जर त्याचा भुर्दंड बसत असेल तर शासनाने या प्रश्‍नात लक्ष घालून महावितरणला आर्थिक मदत करावी. पण, ग्राहकांच्या माथी वीजदरवाढ लादू नये ही या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे. 
-वैभव गायकवाड, ग्राहक. 

डीपी त्वरित बदलून मिळावा 
विजेची मागणी वाढल्यानंतर अनेकवेळा डीपी जळण्याचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी महावितरणकडून वेळेत डीपी बदलून देण्याची कार्यवाही होत नाही. डीपी वेळेत बदलून न मिळाल्यास पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. ते टाळणे गरजेचे आहे. डीपी दुरुस्त करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या साधनसामग्रीचा पुरवठा महावितरणला वेळेत करण्यासाठीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी. जेणेकरून नादुरुस्त डीपी शेतकऱ्यांना त्वरित देणे सोईचे होईल. 
दयानंद भोसले, शेतकरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com