बियाणे उगवणीच्या तक्रारीसाठी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 27 जून 2020

मागील पंधरवड्यापासून शेतकऱ्यांनी जास्त बियाणे खरेदी सुरू केली होती. या वेळी हंगामाच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण खूपच चांगले होते. सोलापूर जिल्ह्याच्या उस्मानाबाद परिसरालगत मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. काही वर्षांत सोयाबीन पिकाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. कमी कालावधी व पावसात हाती येणारे पीक म्हणून शेतकरी त्यास प्राधान्य देतात. 

सोलापूरः सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. अनेक शेतकरी बियाणे विक्रेत्यास पाहणी करण्यास येण्याचा आग्रह करत असल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. 

हेही वाचाः बार्शीत युवक कॉंग्रेसने केला कोरोना योध्दयांचा सन्मान 

मागील पंधरवड्यापासून शेतकऱ्यांनी जास्त बियाणे खरेदी सुरू केली होती. या वेळी हंगामाच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण खूपच चांगले होते. सोलापूर जिल्ह्याच्या उस्मानाबाद परिसरालगत मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. काही वर्षांत सोयाबीन पिकाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. कमी कालावधी व पावसात हाती येणारे पीक म्हणून शेतकरी त्यास प्राधान्य देतात. 

हेही वाचाः पुरंदावडेच्या गोल रिंगण सोहळ्याच्या आठवणी मनी दाटल्या.. 

मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर काही भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण पेरलेले बियाणे उगवलेच नाही असे दिसले. मराठवाडा व विदर्भातून सोयाबीन जास्त उगवले नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. सोलापूर परिसरात शेतकऱ्यांनी काही दिवस उगवणीची वाट पाहिली. मात्र, उगवण होत नसल्याचे आढळले. तेव्हा शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केलेल्या दुकानात येऊन विक्रेत्यांकडे तक्रारी केल्या. तसेच संबंधित विक्रेत्यांना त्यांनी स्वतः शेतात येऊन पाहणी करावी, अशी मागणी केल्याने विक्रेते त्रस्त झाले आहेत. पंचायत समिती कृषी विभागाकडे अशा तक्रारीची नोंद घेऊन पंचनामे करण्याची सोय असते. पण, सध्या तरी शेतकरी विक्रेत्याकडे येऊन तक्रारी करत आहेत.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers crowding in shops to complain seed germination