टाकळी येथे बिबट्याने केली शेळी फस्त; भीतीने थांबली शेतीची कामे

Leopard
Leopard
Updated on

जिंती (सोलापूर) : टाकळी (ता. करमाळा) शिवारात काल पहाटे बिबट्याने लोचिराम करचे यांच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळी फस्त केली. वनविभाग मात्र सुस्तच आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर आहे. पिंजरा लावण्यासाठी कात्रज येथील शेतकऱ्यांनी मागणी केली होती, परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारीला वनविभागाने केराची टोपली दाखवली आहे. काल दुसरी शेळी खाल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. 

बिबट्याच्या भीतीने शेतीची कामे बंद झाली आहेत. कात्रज (ता. करमाळा) येथील शिवारात 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्यासदृश प्राण्याने एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेळी खाल्लेल्या जागेचा पंचनामा केला. तसेच त्या जागेवरील पायांच्या ठशांचे फोटो घेतले होते. या ठशांचा अहवाल बुधवारी (ता. 12) आला होता. त्या अहवालामध्ये संबंधित ठसे हे बिबट्याचेच आहेत, अशी माहिती मोहोळचे वनपाल डी. डी. साळुंखे यांनी दिली होती. तरी देखील वनखात्याने पिंजरा लावण्यासाठी उपाययोजना केलेली नाही. हा भाग उजनी परिसरातील असून या परिसरातील नागरिक हे शेतामध्ये राहण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे या बिबट्यापासून शेतकऱ्यांना व त्यांच्या पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे. 

याबाबत टाकळीचे माजी सरपंच गोरख गुळवे म्हणाले, करमाळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात टाकळी, कात्रज, कोंढार चिंचोली परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. कात्रज व काल टाकळी येथील स्थानिक रहिवासी लोचीराम कर्चे यांच्या शेतातील गोठ्यातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. यासंदर्भात मी करमाळा तालुक्‍याचे आमदार संजय शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क करून घटनेची माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे आमदार शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्यासाठी सूचना दिल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ashti medium project water storage 60 percent farmers demand eight hours electricity supply for irrigation in mohol solapur
Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com