अन्यथा जिथून आलात तिथे पाठवण्यात येईल

हुकूम मुलाणी
Sunday, 17 May 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणेसह बाहेरगावावरून तालुक्यात आलेल्या नागरिकांनी सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. त्याचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाईसह पास रद्द करून ते जिथून आले तिथं परत पाठवण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिला.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणेसह बाहेरगावावरून तालुक्यात आलेल्या नागरिकांनी सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. त्याचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाईसह पास रद्द करून ते जिथून आले तिथं परत पाठवण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिला.
कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी मंगळवेढ्यातील प्रशासन यंत्रणा सतर्क असून पुण्याहून आलेल्या महिलेस ताप खोकलाची लक्षणे दिसून आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ त्या कुटुंबातील सात सदस्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचे घरात विलगीकरण करण्यात आले. त्याचे स्वॅब तपासण्यात येणार आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागामध्ये परगावहून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक व घरात विलगीकरण करण्यात आले असून त्यांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये. तसे केल्यास साथरोग भारतीय साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सर नुसार कारवाई करण्यात येईल. पुण्यातील महिला गेल्या आठवडाभर मंगळवेढा येथे आली असून तिला त्रास होत असल्याने ती उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाली. ते समजतात कारण नसताना घराबाहेर पडणारे लोक मात्र काल दुपारपासून घरात बसू लागले. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लि करा
शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भोसले यांनी केले. दरम्यान जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी नगरपालिकांना जिल्हा नियोजन मंडळ मधून 25 लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. कोरोना साथीमुळे नगरपालिका कराची वसुली थांबल्यामुळे या निधीमुळे नगरपालिका हद्दीत क्वारंटाइन केलेल्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, मास्क सुविधा उपलब्ध करता येणे शक्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of a woman falling ill in Mangalwedha taluka