'अंतिम'ची परीक्षा पुढे ढकलली ! व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर झाला क्रॅश 

तात्या लांडगे 
Tuesday, 6 October 2020

विद्यापीठाने वेळापत्रकात केलेला बदल... 

 • 6 ऑक्‍टोबरला होणारी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे 21 ऑक्‍टोबरला होईल 
 • व्हायरस अटॅकमुळे परीक्षेचा झाला सर्व्हर क्रॅश; 7 व 8 तारखेच्या परीक्षा आता 22 व 24 ऑक्‍टोबरला 
 • 9 ऑक्‍टोबरला होणारी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल 
 • सर्व्हर लोडवर येत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत होणार नाही 
 • इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाची परीक्षा आता दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत होईल 
 • पांरपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत होणार 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे 5 ऑक्‍टोबरपासून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, 7 आणि 8 ऑक्‍टोबरला होणाऱ्या परीक्षा 22 आणि 23 ऑक्‍टोबरला घेतल्या जातील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. व्हायरस अटॅकमुळे परीक्षेचा सर्व्हर क्रॅश झाल्याचे कारण विद्यापीठाने पुढे केले आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्यास काही अडचण नसल्याचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्पष्ट केले होते. दरम्यान, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत म्हणून डेमो टेस्ट घेतली जाईल, असेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा पोर्टलमधील तांत्रिक चुकांमुळे सोमवारी (ता. 5) पहिल्याच दिवशी सुमारे एक हजार 400 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांसह संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकांच्या ढिगभर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे विद्यापीठाने सर्व्हर दुरुस्ती करुन परीक्षा घेण्याचे ठरविले असून बुधवार व गुरुवारी (ता. 8) होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले. 

परीक्षा विभागाची चावी घेऊन आंदोलक पसार 
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परीक्षा पोर्टलमधील त्रुटी दुरुस्त करुन परीक्षा घ्यावी. तत्पूर्वी, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत विद्यार्थी कॉंग्रेसने मंगळवारी (ता. 6) विद्यापीठातील परीक्षा विभागाला टाळे ठोकले. त्यावेळी विद्यापीठाने त्रुटी दुरुस्त होईपर्यंत परीक्षा पुढे न ढकलल्यास कुलगुरुंच्या दालनास कुलूप लावू, असा इशारा विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिला. दरम्यान, परीक्षा विभागाला कुलूप लावून विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी कुलूप लावून चावी घेऊन पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी चावी घेऊन येण्यास सांगितले, मात्र मागण्या मान्य करा मगच चावी देतो, यावर विद्यार्थी कॉंग्रेस ठाम आहे. 

विद्यापीठाने वेळापत्रकात केलेला बदल... 

 • 6 ऑक्‍टोबरला होणारी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे 21 ऑक्‍टोबरला होईल 
 • व्हायरस अटॅकमुळे परीक्षेचा झाला सर्व्हर क्रॅश; 7 व 8 तारखेच्या परीक्षा आता 22 व 24 ऑक्‍टोबरला 
 • 9 ऑक्‍टोबरला होणारी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल 
 • सर्व्हर लोडवर येत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत होणार नाही 
 • इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाची परीक्षा आता दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत होईल 
 • पांरपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत होणार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Final' exam postponed ; The server crashed due to a virus attack