ऑस्ट्रेलियातून आली कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत : युवकाचा पुढाकार

प्रशांत देशपांडे 
बुधवार, 17 जून 2020

युवा उद्योजकाकडून मदतीचा हात 
श्रीगणेश वल्लाकाटी मूळचे सोलापूर शहरातील राजेंद्र चौक येथील रहिवासी आहेत. शिक्षणानंतर उद्योग करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलिया गाठले. श्रीगणेश गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. परदेशात राहात असले तरी त्यांनी त्यांच्या मातृभाषेशी नाळ तोडली नाही. सामाजिक भान म्हणून ते वेळोवेळी संस्थांना मदत करत असतात. 

 सोलापूर : कोरोनाची महामारी टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केले आहे. त्यामुळे अनेकांना कामाविना घरी बसावे लागले. ज्यांचे रोजचे हातावरचे पोट आहे, त्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. आज लॉकडाउनमध्ये शिथिलता आली तरी अद्याप लोकांच्या हाताला काम नाही. परिणामी अन्नाविना प्रचंड हाल होताहेत. या लोकांच्या पोटापाण्याचा काही अंशी प्रश्‍न मिटावा, यासाठी थेट ऑस्ट्रेलियातून एक युवकाने आर्थिक मदत पोचवली. 

एम. जे. प्रथम मानव सेवा संस्था ही सोलापुरातील एक सेवाभावी संस्था असून मागील दोन वर्षांपासून गरीब, बेवारस आणि वंचितांना अन्न पुरविण्यापासून त्यांची वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य करत आहे. संस्थेचे हे समाजकार्य समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने व संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्यातून चालते. सध्या लॉकडाउनच्या काळातही गरीब आणि बेवारस लोकांना एकवेळच्या अन्नाची व्यवस्था या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. 

हेही वाचा : अनेकांना फळांचा स्वाद घेता आला नाही 

एम. जे. प्रथम मानव सेवा संस्थेच्या सेवाकार्याची माहिती फेसबुकवर पाहून मूळचे सोलापूरचे व सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक व्यावसायिक श्रीगणेश वल्लाकाटी यांनी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मोहन तलकोकुल यांना मोबाईलवर संपर्क साधून संस्थेच्या खात्याची माहिती घेऊन थेट आर्थिक मदत संस्थेच्या खात्यावर टाकली. संस्थेकडून होत असलेल्या मानव सेवेने प्रभावित होऊन त्यांनी ही मदत पाठवली आहे. या मदतीमुळे गोरगरीब, बेघर, निराधारांना एकवेळचे जेवण, चहा-नाश्‍ता तसेच धान्य कीट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा : केंद्र सरकारच्या आत्मनिर्धार योजनेची मदत, रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार आजपासून मिळणार हरभरा, तांदुळ 

युवा उद्योजकाकडून मदतीचा हात 
श्रीगणेश वल्लाकाटी मूळचे सोलापूर शहरातील राजेंद्र चौक येथील रहिवासी आहेत. शिक्षणानंतर उद्योग करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलिया गाठले. श्रीगणेश गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. परदेशात राहात असले तरी त्यांनी त्यांच्या मातृभाषेशी नाळ तोडली नाही. सामाजिक भान म्हणून ते वेळोवेळी संस्थांना मदत करत असतात. 

वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत 
वल्लाकाटी यांचा 16 जून रोजी वाढदिवस होता.आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत वाढदिवसाची सर्व रक्कम त्यांनी गरजूंना अन्नधान्य देण्यावर खर्च केली. लॉकडाउन लागू झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाख रुपये लोकांना अन्नधान्य वाटपावर खर्च केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial aid for corona victims from Australia: Youth Initiative